Mon, Sept 25, 2023

आरे सरपंचपदी दतात्रय कुबडे, तर उपसरपंचपदी नंदिनी चौगले बिनविरोध
आरे सरपंचपदी दतात्रय कुबडे, तर उपसरपंचपदी नंदिनी चौगले बिनविरोध
Published on : 20 May 2023, 1:07 am
01544,
01545
...
आरे ग्रामपंचायत सरपंचपदी दतात्रय कुबडे
सोनाळी ः आरे (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दतात्रय कुंडलिक कुबडे यांची तर उपसरपंचपदी नंदिनी सुरेश चौगले यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी कसबा बीडचे मंडल अधिकारी प्रवीण माने होते. गटांतर्गत झालेल्या समझोत्यानुसार मावळत्या सरपंच, उपसरपंचांनी राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त होती. या जागेवर या निवडी झाल्या. यावेळी मावळते सरपंच सागर पाटील, उपसरपंच संगीता वरूटे, गटनेते जयदिप मोहिते, जगदिश मोहिते, महेश बाजीराव वरुटे, शिवाजी पाटील, बाळासाहेब वरूटे, निवास मोहिते, आनंदा सोरटे, तलाठी आकांक्षा पाटील आदी उपस्थित होते. ग्रामसेवक महादेव तिवले यांनी आभार मानले.