प पटा पान ८ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प पटा पान ८
प पटा पान ८

प पटा पान ८

sakal_logo
By

01077
शिरगाव (ता. शाहूवाडी) ः अविनाश कुंभार यांनी राजर्षी शाहू स्मृतिशताब्धीनिमित्त १०० पुस्तके विद्यार्थ्यांना देताना विद्यार्थी व शिक्षक.

शाहूंच्या कार्याच्या प्रसारासाठी
शिक्षकाने वाटली १०० पुस्तके
सरुड ः लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्धीनिमित्त शिरगाव (ता. शाहूवाडी) शाळेचे अध्यापक अविनाश बाळासाहेब कुंभार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावी व शाहूंच्या विचारांचा प्रसार व्हावा, या हेतूने सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना प्रा. नानासाहेब साळुंखे लिखित ‘शाहूंच्या आठवणी’ या पुस्तकाच्या १० हजार रुपये किमतीच्या १०० पुस्तकांचे मोफत वाटप केले. गतवर्षी अविनाश कुंभार यांनी शिरगाव शाळेच्या परिसरात १ लाख रुपये खर्च करून आंबा, फणस, चिंच, पेरू, चिक्कू, कदंब, सप्तपर्णी, सोनचाफा आदी फळे फुले व औषधी उपयोग असणारी जवळपास १२७ दीर्घायुषी व बहुउपयोगी झाडे लावली आहेत. यावेळी शिरगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष सुनील लोहार, सदस्य प्रकाश लोहार, मुख्याध्यापक मारुती गुरव, शिवाजी रोडे-पाटील, गोपीनाथ केंद्रे आदी उपस्थित होते.

02617
पन्हाळा ः येथील पुरातन महालक्ष्मी मंदिरात देवी अंबाबाई सेवा मंडळातर्फे कुंकुमार्चनसाठी जमलेल्या महिला.

पन्हाळ्यात कुंकुमार्चन विधी
पन्हाळा ः येथील पुरातन महालक्ष्मी मंदिरात देवी अंबाबाई सेवा मंडळातर्फे कुंकुमार्चन विधी झाला. वैदेही लोटलीकर आणि कृष्णा पोवार यांच्या हस्ते हे विधीचे आयोजन झाले. या विधीला गडावरील साधारण दीडशेहून अधिक महिला उपस्थित होत्या. महालक्ष्मी मंदिरात मध्यंतरी शतचंडी यज्ञाचे आयोजन केले होते. दरवर्षी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दर मंगळवारी, शुक्रवारी महिलांचा जोगवा, भजन सुरू असते. देवी अंबाबाई सेवा मंडळ मंदिरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.


०१७०६ तानाजी पाटील
०१७०८ सागर आरदाळे
अध्यक्षपदी तानाजी पाटील
सेनापती कापशी : मुगळी (ता. कागल) येथील श्रीराम विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी तानाजी संतू पाटील आणि उपाध्यक्षपदी सागर बंडा आरदाळे यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी जे. एन. बंडगर होते. संस्थापक रामचंद्र गणू सांगले यांच्या उपस्थितीत निवड झाली. संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. येथे मंडलिक गटाची सत्ता आहे. यावेळी नूतन संचालक आनंदा बाळू नाईक, प्रकाश मारुती कुणकेकर, श्रावण दादू पाटील, राजाराम मारुती सांगले, विलास हरी येजरे, कृष्णा काळू गुरव, शिवाजी विष्णू डवरी, शंकर भूपाल भोसले, लीलाताई दिलीप कुणकेकर, गीता दत्तात्रय येजरे आदी उपस्थित होते.


बाबासाहेब चौगले
२१३७५
केर्लीची हनुमान सेवा संस्था बिनविरोध
भुये : केर्ली (ता. करवीर) येथील हनुमान विकास सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. यंदाही बिनविरोधची परंपरा कायम राखली. निवडणूक निर्णय अधिकारी एन. ए. माने यांनी काम पाहिले. ‘गोकुळ’चे संचालक बाबासाहेब चौगले यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची घोडदौड सुरू आहे. संचालक असे सरदार चौगले, बाजीराव कदम, दीपक संकपाळ, सचिन चौगले, सर्जेराव शिंदे, संभाजी खडके, पांडुरंग पाटील, अर्जुन बोडके, सदाशिव पाटील, दत्तात्रय व्हरांबळे, महादेव चौगले, मारुती नलवडे, शोभा गवळी, हौसाबाई बोडके, कृष्णात कांबळे, संभाजी कुंभार, अशोक माने यांचे सहकार्य लाभले.

‘बनावट संदेशांना प्रतिसाद देऊ नये’
कोल्हापूर : वीज ग्राहकांनी बनावट संदेशाना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
पत्रकात म्हटले आहे, जिल्ह्यात इचलकरंजी, हातकणंगलेसह काही भागांत नागरिकांना वीज बिल भरण्यासंदर्भाने बनावट ‘एसएमएस’प्राप्त झाल्याचे समजले आहे. ‘मागील महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ताबडतोब भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा’, अशा आशयाचे बनावट ‘एसएमएस’ नागरिकांना वेगवेगळ्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावरून दिले जात आहेत. महावितरणकडून वीज ग्राहकांना प्रणालीद्वारे केवळ नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा संदेशक (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. महावितरणकडून अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत कळविले जात नाही.


रोजगार मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा १९ ते २२ कालावधीत होत आहे. हा ऑनलाईन असून, ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह, रिलेशनशिप मॅनेजर, सॉफ्टवेअर डेव्हलपर ॲन्ड मॅन्युअर टेस्टर, पीएचपी डेव्हलपर/वेब डेव्हलपर, ग्राफिक डिझायनर, बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, एससीओ एक्झिक्युटिव्ह, पीएचपी डेव्हलपर/वेब डेव्हलपर, सपोर्ट एक्झिक्युटिव्ह फार बँक/को-ऑपरेटिव्ह सॉफ्टवेअर, विमा प्रतिनिधी, क्लार्क अशा रिक्त पदांसाठी जिल्ह्यातील नामांकित सात आस्थापनांनी आजअखेर १४० पेक्षा जास्त रिक्त पदांद्वारे संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी युझर आयडी आणि पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करा. शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी पसंतीक्रम आणि इच्छुकता ‘ऑनलाईन’ पद्घतीने नोंदवावा.

Web Title: Todays Latest Marathi News Snk22b01311 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top