सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक रखडणार नाही -शशिकांत खोत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक रखडणार नाही -शशिकांत खोत
सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक रखडणार नाही -शशिकांत खोत

सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक रखडणार नाही -शशिकांत खोत

sakal_logo
By

44400


संताजी घोरपडे यांच्या स्मारकासाठी निधी प्राप्त
शशिकांत खोत; समरजितसिंह घाटगे यांचे ते विधान अपुऱ्या माहितीवर
सकाळ वृत्तसेवा
सेनापती कापशी, ता. १९ : सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या येथील स्मारकासाठी निधी प्राप्त झाला आहे. त्याचे काम थांबणार नाही, अशी माहिती स्मारक समितीचे सदस्य शशिकांत खोत यांनी दिली. समरजितसिंह घाटगे यांनी रखडलेले स्मारक पूर्ण करू असे विधान केले होते. त्यावर श्री. खोत यांनी ही माहिती दिली.
श्री. खोत म्हणाले, ‘‘२०१२ मध्ये मंजूर झालेल्या स्मारकावर २०१४ पर्यंत एक कोटी सत्तर लाख रुपये खर्च झाले. युती सरकार सत्तेवर आल्यावर समरजितसिंह घाटगे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी स्मारकासाठी निधी आणला नाही. त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री झाले आणि पुन्हा निधी मिळून काम सुरू झाले. मुश्रीफ यांनी ग्रामविकास विभागातून निधीची तरतूद केली आणि नवीन आराखड्यानुसार सहा कोटी ७५ लाख रुपयाचा निधी वर्ग करून घेतला आहे. स्मारकाचे डिझाईन आर्किटेक अमरजा निंबाळकर यांनी केले आहे. स्मारकाच्या शासकीय समितीवर इतिहास तज्ज्ञ प्रा. जयसिंगराव पवार यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे कोणतेही सरकार आले तरी स्मारकाचे काम थांबणार नाही. समरजितसिंह घाटगे यांनी स्मारकाच्या निधीबाबत माहिती घेऊन बोलावे.’’
ते म्हणाले, ‘‘पायाभरणी झाल्यापासून आजपर्यंत या स्मारकाच्या बाबतीत त्यांचे योगदान काय. ज्यांनी काम केलं त्याचं कौतुक करण्याऐवजी राजकारणासाठी त्याचा वापर करणे म्हणजे हतबलता व्यक्त करत आहेत. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. आता कोणाचेही सरकार आले, तरी हे स्मारक थांबणार नाही. त्यांच्या सरकारच्या काळात नवीन एखादे विधायक काम मंजूर करून आणावे आणि ते पूर्ण करून त्याचे उदघाटन करावे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Snk22b01357 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..