हुतात्मा स्वामी सेवा संस्थेकडून सभासदांना 18 टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुतात्मा स्वामी सेवा संस्थेकडून सभासदांना 18 टक्के लाभांश
हुतात्मा स्वामी सेवा संस्थेकडून सभासदांना 18 टक्के लाभांश

हुतात्मा स्वामी सेवा संस्थेकडून सभासदांना 18 टक्के लाभांश

sakal_logo
By

‘हुतात्मा स्वामी सेवा’चा १८ टक्के लाभांश
सेनापती कापशी : येथील श्री हुतात्मा करवीरय्या स्वामी विकास सेवा संस्थेची ७४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष शशिकांत खोत होते. त्यांनी वीस वर्षांचा आढावा घेत सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रक्कम व भेटवस्तू स्वरुपात १८ टक्के लाभांश जाहीर केला. श्री. खोत म्हणाले, ‘अहवाल वर्षात खेळते भागभांडवल सहा कोटी आठ लाख ८९ हजार ९१४ असून १५ लाख ८९ हजार रुपये नफा झाला. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नफ्यातून सभासदांना रोख व भेटवस्तू स्वरूपात १८ टक्के लाभांश जाहीर केला.’ उपाध्यक्ष प्रवीण नाईकवडी, संचालक सुनील चौगले, सूर्यकांत भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. जयसिंग कुंभार, राजेंद्र माळी, इसाक मकानदार, अरुण दुधाळे, दत्तात्रय सूर्यवंशी, संजय नाईक उपस्थित होते.