तमनाकवाड्यात रात्रीत तीन ठिकाणी चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तमनाकवाड्यात रात्रीत तीन ठिकाणी चोरी
तमनाकवाड्यात रात्रीत तीन ठिकाणी चोरी

तमनाकवाड्यात रात्रीत तीन ठिकाणी चोरी

sakal_logo
By

तमनाकवाड्यात रात्रीत तीन ठिकाणी चोरी

सेनापती कापशीः तमनाकवाडा (ता. कागल) येथे तीन ठिकाणी झालेल्या चोरीत तीन तोळे सोने आणि सहा हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. सोने, साहित्य व रोख रक्कम अशी दीड लाख रुपयांची चोरी झाली. शुक्रवारी (ता. ७) मध्यरात्री ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झाली नव्हती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील सुभाष भैरू पाटील कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या मध्यवस्तीत असलेल्या घराचे कडी कोयंड्याचे स्क्रू खोलून घरात प्रवेश केला. तिजोरीचे कुलूप उचकटून कर्णफुले, झुबे, मंगळसूत्र असे तीन तोळे सोने आणि दोन हजार रुपये लांबविले. घरातील २५ नवीन साड्याही लांबविल्या. घरातील धान्य व साहित्य विस्कटले. येथून जवळच असणाऱ्या शेवंता शंकर तिप्पे यांच्या घरातील दोन हजार रुपये लांबविले. चौकातील एका दूध संस्थेचेही कूलूप तोडले, मात्र येथे काही मिळाले नाही. एसटी थांब्याजवळील विनायक तिप्पे यांच्या बाळूमामा ट्रेडर्समधील एक हजार रुपये व गुंडाळी पाईप लांबविली.