करड्याळमध्ये साडेचार कोटींच्या विकासकामांची उद्घाटने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करड्याळमध्ये साडेचार कोटींच्या विकासकामांची उद्घाटने
करड्याळमध्ये साडेचार कोटींच्या विकासकामांची उद्घाटने

करड्याळमध्ये साडेचार कोटींच्या विकासकामांची उद्घाटने

sakal_logo
By

01880
करड्याळ ः प्राथमिक शाळेच्या खोल्यांचे उद्घाटन करताना आमदार मुश्रीफ व संजयबाबा घाटगे.

साडेचार कोटींच्या विकासकामांचा
करड्याळमध्ये लोकार्पण सोहळा
सेनापती कापशी, ता. २४ : करड्याळ (ता. कागल) येथे साडेचार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते झाले.
संजयबाबा घाटगे म्हणाले, ‘आयुष्यभर परोपकारी वृत्तीने कार्यरत राहिलो. गोरगरीब कार्यकर्त्यांना जीवापाड जपले.’ आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘मी आणि संजयबाबा घाटगे तीस वर्षे एकमेकांशी संघर्ष करत राहिलो. एका ऐतिहासिक वळणावर आम्ही एकत्र आलो. संजयबाबांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान ठेवू.’ शशिकांत खोत म्हणाले, ‘जनतेच्या कल्याणकारी विचारांतूनच आमदार मुश्रीफ व संजयबाबा घाटगे ही मित्रांची जोडी एकत्र आली आहे. त्याला दृष्ट लागू देऊ नका.’
यावेळी दिग्विजयसिंह पाटील, सरपंच विठ्ठल टिपुगडे, उपसरपंच सुरेश गेंगे, शामराव पाटील, दाजी कुंभार, शशिकांत पाटील, युवराज आडसूळ, आनंदा कुंभार, पांडुरंग बिरंजे प्रमुख उपस्थित होते. ॲड. अरुण पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक जीवन फेगडे, तर सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. संजय पाटील यांनी आभार मानले.