
संताजी घोरपडे साखर कारखान्यात तीन लाख ११ हजार १११ साखर पोत्यांचे पूजन
01925
काळम्मा बेलेवाडी : साखर पोत्यांचे पूजन करताना नवीद मुश्रीफ. यावेळी संजय शामराव घाटगे, अधिकारी, शेतकरी व कर्मचारी.
संताजी घोरपडे कारखान्यात
तीन लाखांवर साखर पोत्यांचे पूजन
सेनापती कापशी, ता. १२ : काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात यावर्षीच्या तीन लाख ११ हजार १११ साखर पोत्यांचे पूजन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यंदा ३० नोव्हेंबरअखेर ऊसबिलांसह तोडणी-वाहतुकीची बिलेही जमा केल्याची माहिती श्री. मुश्रीफ यांनी दिली.
श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘ज्यूसपासून इथेनॉलनिर्मिती आणि बायो सीएनजी प्रकल्प व गाळप विस्ताराचे काम सुरू आहे. बी हेवी मोलॅसिससह दैनंदिन साखर उतारा १२.७२ टक्के व सरासरी साखर उतारा ११.६४ आहे. ५१ दिवसांत दोन लाख ९६ हजार २०० टन गाळप झाले. नऊ कोटी युनिट उद्दिष्टांपैकी दोन कोटी ६३ लाख ८६ हजार ४४० युनिट वीजनिर्मिती झाली. त्यापैकी एक कोटी ६७ लाख ७४ हजार ५०० युनिट वीज महावितरणला निर्यात झाली. ३० लाख २८ हजार ४९८ लिटर इथेनॉलनिर्मिती झाली. त्यापैकी १४ लाख २१ हजार लिटर निर्यात झाली.’ शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन केले. जनरल मॅनेजर संजय घाटगे, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.