पासष्टीतील माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून प्रयोगशाळा सुसज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पासष्टीतील माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून प्रयोगशाळा सुसज्ज
पासष्टीतील माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून प्रयोगशाळा सुसज्ज

पासष्टीतील माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून प्रयोगशाळा सुसज्ज

sakal_logo
By

01971

निमित्त मेळाव्‍याचे, भाग्य खुलले प्रयोगशाळेचे
७५ हजारांचे साहित्य; सेनापती कापशीत माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व

सेनापती कापशी ता. १० : येथे माजी विद्यार्थ्यांनी शाळेला ७५ हजारांचे विज्ञान प्रयोग साहित्य देऊन प्रयोगशाळा समृद्ध केली. येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालयात शिकलेल्या १९७२-७३ मधील ४५ विद्यार्थ्यांनी भेटीगाठींबरोबर दातृत्व दाखवले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सविता कुलकर्णी होत्या.
ज्यांची मुलेच नव्हे, तर नातवंडेही ज्या शाळेने घडवली. त्या शाळेत ५० वर्षानंतर पुन्हा येण्याची संधी आय. डी. कुंभार आणि सहकाऱ्यांमुळे मिळाली. त्यावेळेच्या ७५ विद्यार्थ्यांपैकी २१ काळाच्या पडद्याआड गेले. उरलेल्या ५४ पैकी ४५ भेटले. स्नेहमेळाव्यात मैत्री आणि आठवणींनी ‘आजोबा-आजींनी’ दुःख आणि आनंद असे संमिश्र भाव अनुभवले. नव्या पिढीला विज्ञानाचे ज्ञान मिळावे यासाठी प्रयोगशाळा सुसज्ज केली. त्यावर ७५ हजार खर्च केले. तत्कालीन शिक्षक श्री. शहा यांचा सत्कार केला. सदाशिव सव्वाशे, सतीश गोसावी, वसंत देसाई, शुभांगी खतकल्ले, शांता नाईकवाडी, चंद्रकांत लठ्ठे, शिवाजी बाबर, ईश्वरा कुंभार, ईश्वर कोले, निर्मला जोशी उपस्थित होते. एस. डी. साठे, आनंदा इंगवले, अजमुद्दिन देसाई, रहेमान देसाई, शामराव कुंभार, पांडुरंग पसारे यांनी मनोगत व्यक्त केले. निसार मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले.