यात्रांसाठी बकऱ्यांच्या विक्रीने अर्धा कोटीचा टप्पा ओलांडला

यात्रांसाठी बकऱ्यांच्या विक्रीने अर्धा कोटीचा टप्पा ओलांडला

02022
सेनापती कापशी : यात्रांसाठी मेंढरांचा गर्दीने फुललेला बाजार. (छायाचित्र : सार्थक फोटो, कापशी)

यात्रांसाठी बकऱ्यांची ६१ लाखांची उलाढाल
सेनापती कापशी परिसर; गतवर्षीपेक्षा दहा लाखांची वाढ

सेनापती कापशी, ता. ६ : चिकोत्रा खोऱ्यातील ग्रामदेवतांच्या यात्रा सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पहिला आठवडी बाजार झाला. यामध्ये निव्वळ मेंढरांची (बकरी) ६१ लाखांची उलाढाल झाली. परिसरातील २५ गावांत यात्रांचा हंगाम दोन महिने चालतो. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये प्रत्येक बाजारातील उलाढाल मोठी होते. यावर्षी पहिल्या बाजारातच गतवर्षीपेक्षा १० लाखांनी वाढ झाली.
प्रत्येक सोमवारी भाजीपाला, मसाले, तेल, कडधान्ये आणि इतर असा २० लाखांचा व्यापार होतो. बाजारादिवशी ग्रामपंचायत पावती घेऊन व्यापार करणारे ३०० विक्रेते असतात. २५ गावांसाठी आठवडा बाजारपेठ असल्याने व्यापारी आणि भाजीपाला, फळ विक्रेते शेतकरीही असतात. परिसरातील ग्रामदेवतेच्या यात्रा मांसाहारी असल्याने फेब्रुवारी व मार्च दोन महिन्यांच्या काळात मांसासाठी मेंढरे आणि बोकड आणि तेल, मसाले आणि इतर खरेदीत मोठी वाढ होते. यात्रा हंगामातील आजचा पहिलाच बाजार होता. येथील जुन्या एसटी स्टॅण्डजवळ बकरी बाजार भरला. विक्रेते आणि ग्राहकांनी सकाळी सातपासूनच गर्दी केली. दुपारी एकपर्यंत बाजार चालला. सात हजारांपासून १५ हजारांपर्यंत बकऱ्यांच्या किमती राहिल्या. केवळ मेंढरांची ६१ लाखांची उलाढाल झाली. सहाशेंवर विक्रेते आले होते. मात्र गतवर्षीच्या तुलनेत सरासरी दीड हजारांची वाढ दिसून आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com