तमनाकवाडा येथे अतिसाराचे 24 रुग्ण आढळले

तमनाकवाडा येथे अतिसाराचे 24 रुग्ण आढळले

तमनाकवाडात आढळले
अतिसाराचे २४ रुग्ण

सेनापती कापशी, ता. २४ : तमनाकवाडा (ता. कागल) येथे सात दिवसांत अतिसाराचे २४ रुग्ण आढळले. आरोग्य विभागाचे पथक येथे काम करत असून, आठवड्यात बारा रुग्ण आढळले. काल सहा आणि आज सहा अशा आणखी बारा रुग्णांची भर पडली. २२ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत आणि दोघे गडहिंग्लजला खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
येथे गावच्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य टाकीशिवाय काही गल्ल्यांमध्ये टाक्या बसवून त्यात बोअरवेलचे पाणी सोडले आहे. आठ दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम झाले होते. त्याच्या खड्ड्यात गटारीचे पाणी गेले आणि पाईपमधून ते पाणी या टाक्यांद्वारे लोकांपर्यंत पोहोचले. यामुळे गावच्या काही भागात अतिसाराचे रुग्ण आढळल्याचे निदर्शनास आले. सौम्य अतिसाराचे रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. येथे डॉ. अमितकुमार आदटराव, डॉ. मोनिका धामणकर, एस. आर. पाटील आणि त्यांच्या पथकाने घरोघरी सर्वेक्षण करून मेडिक्लोरचे वाटप केले. ग्रामपंचायतीने टाक्यांची स्वच्छता करून दोन दिवस पाण्याचा पुरवठा बंद केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com