Thur, Sept 21, 2023

कासारीत शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू
कासारीत शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू
Published on : 31 May 2023, 2:15 am
02145
...
कासारीत शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू
सेनापती कापशी: कासारी (ता. कागल) येथील शेतकरी तानाजी भाऊसो शिंदे (वय ५६) यांचा मंगळवारी (ता.३०) दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. ते कामानिमित्त कापशी येथे गेले होते. काम उरकून घराकडे परतत असताना त्यांना बाजारपेठेतच त्रास जाणवू लागला. कापशी येथे खासगी दवाखान्यात उपचार केले. त्रास कमी होत नसल्याने निपाणी येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. उष्णाघाताच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पत्नी किरकोळ भाजीपाला विक्री व्यवसाय करीत होती. त्यांना ते मदत करत होते. यामुळे ते नेहमी कापशी ते कासारी मार्गावर प्रवास करत असत. मंगळवारी त्यांचा उन्हातून वारंवार प्रवास झाला होता.