
सोळांकूर
दूधगंगानगर परिसर
पाच महिने अंधारात
ग्रामस्थ आक्रमक; महाराष्ट्रदिनी जलसमाधीचा इशारा
सोळांकूर, ता. २७ : दूधगंगानगर (ता. राधानगरी) येथील मार्केट वसाहतीत पाच महिने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. याबाबत मांजर खिंड येथे रास्ता रोकोचा निर्णय घेतला होता; परंतु प्रशासनाने चार दिवसांत कार्यवाही करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. अखेर प्रशासन दखल घेत नसल्याने महाराष्ट्रदिनी सकाळी दहा वाजता दूधगंगानगर येथील धरणाच्या पायथ्याशी कालव्यामध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात बैठक आयोजित केली होती. अधिकाऱ्यांनी वीज वितरणशी चर्चा करून निर्णय घेतो, असे सांगितले होते; परंतु निर्णय झाला नाही.
विद्युत पुरवठा खंडित असल्याने मार्केट वसाहतमधील मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये परिसरातील खेड्यातील लोकांची बाराशेहून अधिक खाती आहेत. यामुळे पोस्टाचे कामही ठप्प आहे. मार्केट वसाहतीभोवती जंगल असल्याने रात्रीच्या वेळी जंगली प्राणी वसाहतीत वावरत आहेत. यातून काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागांना दिल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02176 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..