राउत पुरवणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राउत पुरवणी
राउत पुरवणी

राउत पुरवणी

sakal_logo
By

फोटो

विनायक राऊत; रोजगारनिर्मिती करणारे मराठी उद्योजक

लीड

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यांत ई-स्टोअर इंडिया आणि वेदिक आयुर क्लीअर हेल्थ अँड रिटेल प्रायव्हेट कंपनी दिल्लीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे, लाखो लोकांना रोजगाराची संधी निर्माण करून देणारे, कोरोनासारख्या संकटातही स्वस्त आणि योग्य दरात जीवनावश्यक वस्तू देऊन गोरगरिबांची आधारवड बनलेले, रोजगारनिर्मिती करणारा मराठी उद्योजक विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या कार्याचा आढावा...
---

सामान्य कुटुंबात जन्मलेले विनायक राऊत यांनी बालपणापासूनच कर्तृत्ववान व्यक्ती बनण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा व संघर्ष झेलत यशाचा टप्पा गाठला. केवळ स्व विकासासाठी आत्मकेंद्रित भावना मनात न ठेवता मराठी युवक पुढे गेला पाहिजे. नागरिकांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करणे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात ई-स्टोअर आणि वेदिक आयुर क्लेअर कंपनीच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनात नंदनवन फुलवण्यासाठी विनायक राऊत यांनी प्रयत्न केले. मराठी युवक पुढे गेला पाहिजे यासाठी त्यांनी जन्मगावी उद्योगाची निर्मिती केली त्यातून शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या. गरिबीशी संघर्ष या व्यक्तिमत्त्वाने अनुभवल्याने शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साधनांची उपलब्धता होण्यासाठी राधानगरी व भुदरगड तालुक्यातील शाळांना कोट्यवधींचा निधी वाटप करून शैक्षणिक उठावाला चालना दिली. शाळा, शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी यांच्यात त्यांची प्रतिमा दातृत्वशील बनली. निराधारांना आधार बनण्याचे काम केले.
राधानगरी तालुक्यातील धामणवाडी परिसरातील जमिनीच्या पांढरा पट्टा हरितक्रांतीने फुलून जावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चाची नळपाणीपुरवठा योजना आखली असून, त्याचे कामे सुरू केले. या शैक्षणिक सामाजिक कार्याबरोबरच उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने ई-स्टोअर इंडिया कंपनीच्या माध्यमातून घरोघरी स्वस्त जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. आयुर्वेदिक औषध यातून आरोग्यसंपन्न जीवन देण्याबरोबरच प्रत्येक महिन्याला आर्थिक स्तोत्र निर्माण करण्यात अग्रेसर राहिले आहेत. कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात ३० हजार तर विविध राज्यांत १ लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. लोकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आज देशात अडीचशे मॉल व आयुरच्या एक हजारहून अधिक शॉपी आहेत. एका मराठी माणसाने उद्योग क्षेत्र घेतलेली गरुडभरारी आदर्शवत असून, अनेकांच्या अर्थप्राप्ती लाभलेले मार्गदर्शन निश्चितच सर्वांगीण विकासाला पाठबळ देणारे ठरले आहे. उद्योग व्यवसायातून रोजगारनिर्मिती घडवत विकासाची साखळी कार्यरत राहण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड प्रेरणादायी आहे, अशा उद्यमशील, दातृत्वला व्यक्तिमत्त्वाचा जन्म दिनाच्या लाख लाख शुभेच्छा.

Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02180 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top