राऊत पुरवणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राऊत पुरवणी
राऊत पुरवणी

राऊत पुरवणी

sakal_logo
By

02691
02690

सर्वसामान्यांचे संसार
फुलवणारा कर्मयोगी
-----------
विनायक राऊत

कोणत्याही माणसाच्या अंगी आत्मविश्‍वास, चिकाटी, जिद्द, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर ती व्यक्ती इच्छित धेय्यापर्यंत पोचू शकते.
आजच्या गतिमान व धावपळीच्या युगात आणि कोरोना महामारीत माणूस सैरभैर होऊन जीव मुठीत घेऊन जीवन जगत होते. अनिश्चिततेच्या काळात तरुण निराशावादी जीवन जगत होता, मात्र या काळात तरुण बेरोजगारांना ई-स्टोअर इंडिया कंपनीच्या माध्यमातून रोजगार देऊन त्यांचे संसार फुलवण्याचे काम युवा उद्योजक विनायक राऊत यांनी केले आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त कर्तृत्वान माणसाची प्रतिमा दिवसेंदिवस भरत असते, कारण त्याचे पदार्पणातच शिखरावर असते. याची देही याची डोळा, या उक्तीप्रमाणे स्वतःजवळ करोडो रुपये असतानाही ई-स्टोर इंडिया रेटेल मार्केट कंपनीच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचा प्लॅटफार्म तयार करून पश्चिम महाराष्ट्रातील लाखो युवकांना काम देऊन त्यांच्या कुटुंबात आनंद निर्माण केला आणि त्याच क्षणी एक स्वप्न पाहिले माझ्यावर विश्वास ठेवून आलेल्या प्रत्येकाला आलिशान चार चाकी बीएमडब्ल्यू मिळाली पाहिजे माझ्या सोबत असलेल्या १०० मित्राला १०० बीएमडब्ल्यू मिळतील. तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवन सार्थक ठरेल, यासाठी रात्रीचा दिवस करत स्वतः कष्ट करत आहेत. रात्री-अपरात्री फोन उचलून अडीअडचणी सोडवणूक मार्गदर्शन करतात स्वतः वेल सेटल असताना सामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या भक्कम करू पाहणारा असा आभाळाएवढा माणूस या युगात शोधून सापडणार नाही, दिवा मातीचा की सोन्याचा हे महत्त्वाचे नसून तो अंधारात किती प्रकट प्रकाश देतो, हे महत्त्वाचे आहे.
राधानगरी तालुक्यात दूधगंगा काठी कासारवाडा-पाटणकर छोटे गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या विनायक राऊत यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून मिळेल ते काम करून करिअरची सुरुवात केली. खऱ्या अर्थाने त्यांच्या कर्तृत्वाला ई-स्टोअरच्या माध्यमातून झळाळी प्राप्त झाली, दररोजच्या मिळकतीतून १० टक्के रक्कम समाजासाठी खर्च करावी, असा मूलमंत्र जगण्यात ठेवला, ते सतत म्हणतात कष्ट करा पोटभर मिळेल, विश्वास ठेवा प्रेम मिळेल, सेवा करा सुख मिळेल, भक्ती करा आशीर्वाद मिळेल, सत्कार करा संस्कार मिळेल. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका तर स्वतः चांगलं तेव्हा कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल ते कोणताही स्वार्थ न बाळगता कोणतेही राजकीय पुढाऱ्यांना जमणार नाही, असं काम करत आहे. त्यांनी जिल्हा परिषद शाळा २ कोटींची रोख वस्तू स्वरूपात मदत केली. गेल्या वर्षीच्या कोरोना काळात भाजीपाला, आयुर्वेदिक औषधे व सर्वसामान्य जनतेला मदत केली. आज युवा उद्योजक सात राज्यांत ई-स्टोअर साम्राज्य निर्माण करून अनेक लोकांना या व्यवसायात रोजगार मिळवून देत आहे. त्याचबरोबर इतर नवनवीन उद्योग निर्माण करून मराठी माणसाचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विचार कर मानवी मनात जन्म नाही पुन्हा पुन्हा, या उक्तीप्रमाणे एकदाच भरून देणे आणि हेच त्याचे त्याचे गाणे बनली अशा या करारी व्यक्तिमत्त्वाने घेतलेली भरारी निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आदर्शवत आहे. भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे. इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे आयुष्यात तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होईल तुमच्या वाढदिनी मनापासून शुभेच्छा.

Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02181 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top