राउत पुरवणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राउत पुरवणी
राउत पुरवणी

राउत पुरवणी

sakal_logo
By

हरहुन्नरी, निगर्वी व्यक्तिमत्त्व
काही माणसं धाडसी असतात, तर काही माणसं अष्टपैलू असतात. असेच एक हरहुन्नरी,कर्तृत्ववान, निगर्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे विनायक राऊत
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन असामान्य कर्तृत्वानं जिद्दीनं इ स्टोर इंडिया आणि आयुर क्युअर यासारख्या कंपनीत उभारल्या. या कंपनीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो युवकांच्या हाताला काम मिळाले. शेकडो कुटुंबांची आर्थिक स्थिती उन्नतीकडे चालू लागली.
दुचाकी चालवणारे चारचाकीत पोहोचले. काही वर्षांपूर्वी स्वतःचे घर चालवण्याची भ्रांत ज्या व्यक्तीस असायची ती व्यक्ती आज चार हजार तरुणांचे घर चालवत आहे. रोजगाराच्या माध्यमातून कोरोना काळात ३० ते ३५ हजार लोकांना मदत केली. शैक्षणिक व समाजभान अशाप्रकारचे विविध सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत. शैक्षणिक कार्यासाठी दोन कोटींची मदत केली. कितीतरी गोरगरीब लोकांना मदत केली आणि कोणत्याही राजकीय पदावर नसताना केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे. आपले कर्तृत्व, कार्य हे आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणादायी आहे. आपल्या हातून नि:स्वार्थी समाजसेवा घडो. आपल्यासारख्या धाडसी उद्योजगाची आज देशाला गरज आहे. आपल्या हातून विविध समाजोपयोगी उपक्रम होत राहोत. आपले आरोग्य उत्तम राहावे आणि आपण शतायुषी बनावे, हीच सदिच्छा.
-दिगंबर कालेकर

Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02183 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top