राऊत पुरवणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राऊत पुरवणी
राऊत पुरवणी

राऊत पुरवणी

sakal_logo
By

आदरणीय विनायक राऊत साहेब माझ्या आयुष्यात मार्गदर्शक म्हणून आले आणि माझ्या जीवन नौकेला विकासाची दिशा सापडली. समाजातील उत्साही लोक हेरून त्यांना प्रेरणा देण्याचे काम राऊत साहेबांनी केले. आयुर क्युअरच्या कामात गुंतलेल्या प्रत्येकाच्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त झाली आहे.
सेवानिवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा, हा अनेकांना प्रश्न असतो, मात्र राऊत साहेबांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काम करण्यासाठी वेळ पुरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. राजकारण विरहीत समाजसेवेचे व्रत राऊत साहेबांनी स्वीकारले आहे. आपल्याबरोबरच समाजातील तळागाळाच्या माणसांची प्रगती व्हावी,
यासाठी राऊत साहेबांची धडपड असते. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस जीवनपध्दती बदलून टाकतो.
केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता इ स्टोर इंडिया व आयुर क्युअर या कंपनीचे कामकाज त्यांनी आदर्शवत ठेवले आहे. आयुर क्युअरमध्ये गुंतवणूक केलेल्या एकाही व्यक्तीची गुंतवणूक तोट्यात गेलेली नाही. आयुर्वेदिक उत्पादनांच्या बरोबरीने राऊत साहेबांनी इ स्टोरची संकल्पना समाजात पोहोचवली आहे.
ग्राहकांचा फायदा नजरेसमोर ठेवून त्यांनी सुरू केलेले हे समाजउपयोगी कार्य लोकप्रिय ठरत आहे. विनायक राऊत यांनी आजपर्यंत अनेक शैक्षणिक संस्थांना मदत केली आहे. केवळ आपण पुढे जायचे हा दृष्टिकोन साहेबांनी कधीच नजरेसमोर ठेवला नाही. म्हणून जी व्यक्ती राऊतसाहेबांच्या संपर्कात येते ती व्यक्ती त्यांना आदर्श मानून काम करीत राहते. आमचे मार्गदर्शक असलेले यशस्वी उद्योजक आदरणीय विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

-एस. के. पोवार

Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02184 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top