टुडे २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे २
टुडे २

टुडे २

sakal_logo
By

19242
आदमापूर: सामुदायिक विवाह सोहळ्यातील नवदांपत्याच्या समवेत गोकुळचे संचालक अरुण डोंगळे ,माजी अध्यक्ष विश्वास पाटील, रामभाऊ मगदूम.


सामुदायिक सोहळ्यात
१४ नवदांपत्यांचे विवाह
अरुण डोंगळे व संत बाळूमामा ट्रस्टचा उपक्रम
सरवडे, ता. ३ :आदमापूर,( ता. राधानगरी) येथे गोकुळ दुध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त अरुण डोंगळे चँरिटेबल ट्रस्ट व संत बाळूमामा देवालय फौडेशनतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्यात १४ नवदांपत्याचे विवाह झाले.अरुण डोंगळे व त्यांचे कुटुंबीय १२ वर्षे हा उपक्रम राबवित आहेत. सोहळ्यात सहभागी झालेल्या वधूवरांना पेहराव, संसार उपयोगी भांडी भेट दिली. शासनाने शेतकरी वधूपित्यास १० हजार रुपये व मागासवर्गीय वधू पित्यास २० हजार रुपयांचे अनुदान मिळवून देण्यात येणार आहे. विवाह सोहळ्यासाठी अक्षता, पौराहित्य करण्यासाठी भडजी,वधुवरांना हार व वऱ्हाडी मंडळीसाठी भोजन आदींची व्यवस्था ट्रस्टने केली होती. विवाह सोहळ्यास गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक किसन चौगुले, अभिजित तायशेटे, अंबरिश घाटगे, शशिकांत पाटील, अंजना रेडेकर, संजय पाटील, बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, रमेश वारके, ए.डी.पाटील, शरद पाटील, राजाराम साठे, बी.आर.पाटील, सरपंच विजय गुरव,अनिल पाटील, टी.एस.पाटील, बाजीराव जाधव, महिला बालकल्याण अधिकारी एस. एम. चौगुले, समाज कल्याण अधिकारी सुरेखा डवर आदी उपस्थित होते.अभिषेक डोंगळे यांनी स्वागत केले. संदीप डोंगळ यांनी प्रास्ताविक केले. सुहास डोंगळे यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02187 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top