सोळांकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोळांकूर
सोळांकूर

सोळांकूर

sakal_logo
By

02716

दूधगंगा उजव्या कालव्याला भगदाड
सावर्डे पाटणकर येथील घटना; भूस्खलन होऊन लाखो लिटर पाणी वाया; शेतीचे तळे
सोळांकूर, ता. ६ : काळम्मावाडी धरणाचा दूधगंगा उजव्या कालव्याला सावर्डे पाटणकर (ता. राधानगरी) येथील मोरेंचा नाळवा हद्दीत भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाणी साचून शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ऐन उन्हाळ्यात कालव्याला भगदाड पडल्याने दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागणार असल्याने हजारो हेक्टर शेतीला फटका बसणार आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सततची कालवा फुटी व गळती थांबवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने सायंकाळपर्यंत अद्यापही घटनास्थळी भेट दिली नव्हती.
काळम्मावाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात १९९९ पासून टप्प्याटप्प्याने पाणी सोडले होते; पण दुधगंगा उजवा व डावा कालवा आजवर अनेकवेळा फुटला आहे. फुटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कालव्याचे काम अपूर्ण असताना तसेच अस्तरीकरणाचे कामही निकृष्ट झाले म्हणून कालवेग्रस्त संघर्ष समिती व भुमिपूत्र वेळोवेळी आंदोलन करून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले होते. तरीही ठोस उपाययोजना आजअखेर झाली नाही. कालवा फुटीमुळे स्थानिक शेतकरी त्रस्त असून यावर उपाय म्हणून जिओ सिंथेटिक अस्तरीकरणाचा प्रयोग केला होता. तोही धुळ खात पडला आहे. कालव्यातील झाडे झुडपे व दगडगोटे प्रवाहात अडथळा ठरत आहेत.दरवर्षी लाखो रुपये खर्च कालवा दुरूस्तीवर केला जात आहे. तरीही हे प्रकार का घडत आहेत.अशी विचारणा जनतेतून होत आहे.
कालव्यातून सध्या ८००ते ९०० क्यूसेक दाबाने पाणी सोडण्यात येते आहे. हा दाब आणखी वाढल्यास कालवा फुटीचे प्रकार घडले आहेत. कालव्याला भगदाड पडून पाच तास झाले तरी पाणी वाहत होते. त्यामुळे दूधगंगा नदीमध्ये गढूळ पाणी वाहत होते. सावर्डेचे पोलिस पाटील कृष्णात मोरे, योगेश पाटील, महेश मोरे याचबरोबर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी मधुकर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

को
काळम्मावाडी धरणाचा दूधगंगा उजव्या कालव्याला सावर्डे पाटणकर येथील हद्दीत पडलेले भगदाड चार ते पाच दिवसात पूर्णपणे बुजवण्यात येईल.
- अजिंक्य पाटील, पाटबंधारेचे अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02195 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top