सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

सरवडे येथील एकाला
८.४० लाखांना गंडा
भविष्य बदलण्याचे दाखविले आमिष
सरवडे, ता. ६ : भविष्य बदलण्याच्या नावाखाली येथील एकाची ८ लाख ४० हजारांची फसवणूक झाली आहे. राधानगरी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.
सरवडे येथील मेकॅनिकल इंजिनिअर श्रीकांत सावंत यांची प्रकाश गुरव (रा. आडी) यांच्याशी ओळख झाली. श्री. गुरव याने श्री. सावंत यांच्या पूर्वीच्या आयुष्यातील चुकांमुळे सावंत यांचे पुढील आयुष्य तसेच त्यांच्या मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी गुरवकडे असलेल्या दैवी शक्तींनी देवाकडे प्रार्थना करून तसेच त्यांनी व त्यांच्या पत्नीस वेगवेगळ्या पूजा-अर्चा करण्यास लावून फिर्यादी सावंतकडून ७ एप्रिल २०२१ ते आतापर्यंत ९० हजार रुपये घेतले, तसेच गुरवने त्यांची मुरगूड (ता. कागल) येथील जागेमध्ये सावंत यांना हिस्सा देण्याचे आमिष दाखवून पुण्यात गुरवने आपल्या नावाने फ्लॅट बुकिंगसाठी सावंत यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये घेतले; परंतु ते त्यांना परत न करता फसवणूक केल्याची सावंत यांनी गुरव याच्याविरुद्ध राधानगरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक श्री. कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल स. ई. पाटील पुढील तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02196 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top