
सरवडे
राजकारणातील आश्वासक चेहरा
राधानगरी परिसराचा अभ्यास, कार्यकर्त्यांची मांदियाळी, विकासाला गती देण्याची धडाडी, लढण्याची शक्ती आणि भेटण्याचे आत्मबळ त्यांच्या नसानसात शिगोशिग भरलेले आहे. त्यांना क्षितिजापार भविष्यकाळाचे व्हिजन आहे, हाताशी कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, तरुण तडफदार युवा पिढीचा भक्कम पाठिंबा आहे, अमोघ वक्तृत्व, विकासाभिमुख कर्तृत्व आणि गतिमान नेतृत्व या त्रिवेणी संगमाच्या जोरावर अनुभव यांची सांगड घालून विकासगंगा जनसामान्यांच्या उंबऱ्यापाशी आणतात. सामाजिक व शैक्षणिक कार्याबरोबरच समाजाच्या भल्यासाठी जे जे काही करता येईल, त्यासाठी दातृत्वाचा हात मोरे परिवाराने नेहमीच पुढे केला आहे. हीच परंपरा नेटाने पुढे घेऊन जाणारे परिवारातील नेतृत्व विजयसिंह किसनराव मोरे होय.
-एस. के. पाटील, सरवडे
राधानगरी तालुका राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात काँग्रेसला बळकटी आणण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी विजयसिंह मोरे यांना गोकुळच्या स्वीकृत संचालकपदी निवड करून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोरे यांच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे. गेली तीस वर्षे मोरे यांनी गोकुळ दूध संघात संचालक पदासाठी प्रयत्न केले. परंतु खंबीर नेतृत्वाची साथ मिळाली नसल्याने त्यांना डावलण्यात येत होते. गेली सहा ते सात वर्षांपासून मोरे यांनी सतेज पाटील यांचे नेतृत्व स्वीकारले. यावेळी पॅनेलमधून त्यांना डावले होते. तरीही त्यांनी पालकमंत्र्यांची साथ सोडली नाही. त्यांची निष्ठा पाहून मोरे यांना न्याय देण्यात आला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचाही गट मजबूत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी शिरकाव केला असून, तालुक्यात गावा गावात शिवसेना वाढविण्याचे काम जोमाने सुरू केले आहे. राष्ट्रवादीवर शिवसेनेचे वर्चस्वामध्ये आता विजयसिह मोरे यांच्या माध्यमातून काँग्रेसने पुन्हा जोराने शिरकाव केला आहे. दुधगंगा काठावर गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मोरे घराण्याने राखलेल्या वर्चस्वाला आणखी बळ देत येथे काँग्रेसला बळकटी देण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांचा आहे. मोरे यांचे वडील किसनराव मोरे १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले होते. विजयसिंह मोरे यांनी पंचवीस वर्षे बिद्री कारखान्याचे संचालक व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या आई पार्वतीबाई मोरे या जिल्हा परिषद सदस्य,व बिद्री संचालक होत्या. तर त्यांचे भाऊ आर. के. मोरे हे पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत, तर त्यांच्या भावजय कल्पनाताई मोरे सध्या पंचायत समिती सदस्या आहेत. परिसरातील सहकारी संस्था, ग्रामपंचायतीवर त्यांच्या गटाचे वर्चस्व आहे .त्यांच्या या राजकीय वर्चस्वाचा फायदा घेत तालुक्यात काँग्रेसची पाळेमुळे वेगाने प्रसार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
मितभाषी, मनमिळावू व सामान्य माणसाबद्दल आपुलकी ठेवल्याने व्यक्तिमत्वातून जनमानसात त्यांची प्रतिमा आपलेपणाची बनली आहे. त्यांनी माणूस हा स्थायीभाव ठेवल्यामुळे राजकीय पटलावर त्यांचा एक वेगळा ठसा स्वकर्तृत्वाने निर्माण केलेल्या अस्तित्वामुळे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मोरे यांचा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. त्यांच्या राजकीय कार्याची पद्धत प्रत्येकाला आपलं समजून योग्य न्याय देण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या मनमिळावू व संघटन कौशल्यामुळे हे सर्वांमध्ये लोकप्रिय बनले आहेत. सामाजिक राजकीय कामात अग्रभागी राहणाऱ्या मोरे यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठिंब्यावर आपल्याला यश मिळत असल्याचे सांगून बेरोजगार युवकांना संधी देण्यासाठी रोजगार मिळवून देणारा प्रकल्प सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. अनेक सहकारी संस्थांच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. किसनराव मोरे एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शिक्षणाची सुविधा करण्याबरोबर पहिली ते विज्ञान शाखा काढण्याचे काम त्यांनी केली शेतकरी मेळावे, महिला बचत गटाचे काम हे सांस्कृतिक क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे काम केले. व्यायाम मंडळी क्रीडा केंद्र सुरू करून दिशा दिली आहे. गेली ४४ वर्षे कुस्ती मैदान भरून खेळाडूंना उत्तेजन देण्याचे काम करत आहे. त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करत असल्याने त्यांचे व्यक्तिमत्व आदरणीय ठरलेआहे.
Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02200 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..