
पान ५ स पटा
02265
माजगाव ः येथील गल्लीत तुंबलेली गटार
गटारी तुंबल्याने
माजगावात अस्वच्छता
माजगाव ः येथील ग्रामपंचायतीने गटारी स्वच्छ न केल्यामुळे गल्ली बोळात ठिकठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. तुंबलेल्या गटारीमुळे अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. ऐन उन्हाळ्यात तुंबलेल्या गटारीमुळे रोगराईला आमंत्रण ठरत आहेत. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. तरी ग्रामपंचायतने गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायतद्वारा कासारी नदीवरील नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा होत आहे. मुबलक पाणी आणि बहुतांशी नळांनां चावी नसल्यामुळे गटारीतून सांडपाणी वाहते पण कित्येक दिवस ग्रामपंचायतीने गटारीचे स्वच्छ केलेल्या नाहीत. यामुळे जागोजागी प्लॅस्टिक व इतर केरकचरा अडकून गटारी तुंबल्या आहेत. तुंबलेल्या गटारीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. काळेकुट्ट सांडपाणी गटारीत साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे. रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
---
यवलूजच्या विठ्ठल सेवा संस्थेत सत्तांतर
माजगाव ः यवलूज (ता.पन्हाळा) येथील विठ्ठल विकास सेवा संस्थेच्यानिवडणूकीत २५ वर्षानंतर सत्तांतर झाले. आमदार पी.एन.पाटील, आमदार विनय कोरे यांचे समर्थक बाजार समितीचे माजी संचालक शशिकांत अडनाईक, कुंभी कारखान्याचे संचालक अंबाजी पाटील, बाजीराव पाटील, बाजीराव पाटील, डी.के.कोळी, तानाजी भोसले, लक्ष्मण निकम यांच्या नेतृत्वाखालील विठ्ठलाई शेतकरी आघाडीने १७ पैकी १६ जागा जिंकून सत्तांतर घडवले. कुंभीचे संचालक जयसिंग पाटील व सरपंच पांडुरंग काशीद यांच्या सत्तारूढ आघाडीला केवळ एक जागा मिळाली तर आसुर्ले पोर्ले कारखान्याचे माजी संचालक बळवंत पाटील, पांडुरंग पाटील, भिवाजी कोले यांच्या आघाडीला एकही जागा मिळाली नाही. विजयी उमेदवार असे:- शशिकांत आडनाईक, बळवंत कोले, सर्जेराव कोले, दगडू नाईक, संजय निकम, नामदेव पाटील, बाबासाहेब पाटील, रमेश पाटील, वसंत पाटील, विष्णुपंत पाटील, शंकर मोरे, सुमन पाटील मालुताई पाटील, भिकाजी जाधव, श्रीकांत बोरे, आनंदा गोसावी सत्तारूढ गटाचे युवराज पाटील विजयी झाले.
डोणोली सेवा संस्थेत सत्तात्तंर
बांबवडे ः डोणोली (ता. शाहुवाडी) येथील डोणोली विकास सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा पराभव झाला.
यावेळी माजी सत्यजित पाटील, राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड यांच्या संयुक्तिक गटाच्या आघाडीने सत्तात्तंर केले.
विठ्ठल पोवार यांनी नवीन आघाडी निर्माण करत त्यांच्याच गटाच्या सत्ताधारी गटाला आवाहन दिले. यात १३ उमेदवारांना निवडून आणत त्यांना सभासदांनी विश्वास दाखवला. विजयी उमेदवार असे- अरुण पाटील, रामचंद्र शेळके, बाजीराव पाटील, रवींद्र पाटील, मारुती पाटील, हिंदुराव शेळके, रघुनाथ शेळके, शोभा निकम, रेखा पाटील, संभाजी जानकर, लक्ष्मण कुंभार, बाळू निकम, तर राजेंद्र कांबळे बिनविरोध निवडून आले होते. यावेळी ए.पी.होतेकर निवडणूक निर्णय अधिकारी व सागर बनसोडे केंद्रप्रमुख उपस्थित होते. संदीप सिंघण, वसंत पाटील, दिलीप खुटाळे, धनाजी शिंदे आदी उपस्थित होते.
०२७२९
०२७३०
अध्यक्षपदी मारुती चौगले
सोळांकूर ः पनोरी, (ता.राधानगरी) येथील हिंदुराव बळवंत पाटील विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मारुती बाबुराव चौगले तर उपाध्यक्षपदी कृष्णा जोती हजाम यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून स्वप्निल आंगम यांनी काम पाहिले. यावेळी दूध साखर बँकेचे संचालक के.डी.चौगले उपस्थित होते.
संचालक बाबुराव भोपळे, रणजीत चौगले,अजित चौगले, गणपतराव पार्टे, शंकर बरगे, मारुती रावण, मधूकर पाटील, गणपती भोसले, गीता चौगले, सुनिता चौगले उपस्थित होते. गजानन गुळवणी यांनी स्वागत केले. विश्वास चौगले यांनी आभार मानले.
अनफ बुद्रुक शाळेच्या मूल्यांकन समितीची भेट
कडगाव : केंद्र सरकारच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ अंतर्गत अनफ बुद्रुक (ता.भुदरगड) शाळेच्या बाह्य मुल्यांकनासाठी पंचायत समिती, आजराचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनित चंद्रमनी यांच्या समितीने शाळेस भेट दिली. अनफ बुद्रुक शाळेने स्वयंमूल्यांकन केले होते. दरम्यान समितीने शाळेतील पाणी व्यवस्था, शौचालय व मुताऱ्या, शालेय परिसर, हात धुणे , कृती आणि देखभाल, कोविड -१९ या मुद्यांच्या अनुषंगाने पाहणी केली. मुख्याध्यापक लक्ष्मण आंबिटकर, शिक्षक शांताराम केसरकर, प्रविण पाटील, मुख्याध्यापक नंदकुमार पाटील, दत्तात्रय रेपे उपस्थित होते. सागर मोरे यांनी स्वागत केले. सुजाता राणे यांनी आभार मानले.
00329
असळज ः येथील पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील कारखाना कार्यस्थळावरील स्मारकाच्या प्रतिमापूजनप्रसंगी मानसिंग पाटील आदी.
उदयसिंह पाटील यांना अभिवादन
असळज ः पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह सीताराम पाटील यांच्या सोळाव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना विविध ठिकाणी अभिवादन केले. पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या स्मारकाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संचालक मानसिंग पाटील, अभय बोभाटे, जयसिंग पाटील, विक्रमसिंह पाटील, चिप अकौंटंट एस. व्ही. यादव आदी उपस्थित होते. असळज येथील उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालयात संस्थापक उदयसिंह पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. मुख्याध्यापक एस. बी. पाटील आदी उपस्थित होते.
चांदसाब शेख- 20652
सुरेश देवाळे 00891
अध्यक्षपदी चांदसाब शेख
कडगाव : तांबाळे (ता.भुदरगड) येथील नवमहाराष्ट्र विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी चांदसाब इसा शेख यांची तर उपाध्यक्षपदी सुरेश ज्ञानदेव देवाळे यांची बिनविरोध निवड झाली. तीस वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे इसा महम्मद शेख यांचे आकस्मिक निधन झाल्याने निवडणूक बिनविरोध केल्याचे संचालकांनी सांगितले. यावेळी संचालक विष्णू डाफळे, इस्माईल शेख, मोजेस डिसोजा, अल्बर्ट पिंटो, मायकल डिसोजा, मुबारक नाईक, धोंडीराम कांबळे, जुलेखाबी शेख, पूष्पा गुरव, नामदेव सुतार, नागेश जाधव यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच रफिक शेख, मुबारक शेख उपस्थित होते. सचिव नंदकुमार भूतल यांनी आभार मानले.
01058
सडोली ः रा. बा. पाटील विधालयात राष्ट्रीय तंबाखुनियंत्रण कार्यक्रमांतर्गत घोषवाक्य स्पर्धतील विजेत्यांचा सत्कार करताना एकनाथ कुंभार, आर.बी. नेलेकर आदी.
घोषवाक्यात जांभळे, कुंभार, पवार यांचे यश
सोनाळी ः रयत शिक्षण संस्थेचे रा.बा.पाटील विद्यालय सडोली खालसा (ता.करवीर) येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत घोषवाक्य स्पर्धा झाल्या होत्या. यात अनुक्रमे समिक्षा जांभळे हिने प्रथम क्रमांक,पूर्वा कुंभार द्वितीय क्रमांक आयुष पवार याने तृतीय क्रमांक संपादन केला. त्याचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच झाला. रा बा पाटील विद्यालयातील राष्ट्रीय विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्तीवर घोषवाक्य तयार केली. महात्मा गांधी राज्य व्यसनमुक्त पुरस्कार प्राप्त अध्यापक एकनाथ कुंभार यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्याना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देवून गौरवले. यावेळी मुख्याध्यापक आर.बी.नेर्लेकर यांनी उपस्थितांना व्यसनमुक्त जीवनाची शपथ दिली. आर.व्ही शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. साधना पाटील यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02201 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..