
सरवडे
02585
अज्ञात वाहनाने धडकेत
माजी सैनिक ठार
उजळाईवाडी ः गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील महामार्गालगत सर्विस रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडकेत पादचारी ठार झाला.
माजी सैनिक प्रकाश शंकरराव राऊत (६३, जैनमंदिर शेजारी, गोकुळ शिरगाव) असे त्यांचे नाव आहे. आज सायंकाळी हा अपघात झाला. अपघाताची फिर्याद गोकुळ शिरगाव येथील किराणा दुकानदार महेश दत्तात्रेय येमगेकर यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दिली. निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला. अधिक तपास सहायक फौजदार जाधव करीत आहेत.
01913
गांधीनगरातून तरूण बेपत्ता
गांधीनगर : घरातून कोणास काही न सांगता हिरालाल लालचंद कुकरेजा (वय ३८, गांधिनगर) ही व्यक्ती दोन दिवसापासून बेपत्ता झाली आहे. याची फिर्याद भाऊ संजय कुकरेजा यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. रंगाने गोरा उंची पाच फूट तीन इंच चेहरा उभट सरळ नाक काळे डोळे केस काळे अंगात हिरवा कलर चा शर्ट व निळी जीन्स मराठी सिंधी भाषा बोलता येते. अशी व्यक्ती कोणास आढळल्यास गांधी नगर पोलीस ठाणेशी संपर्क साधावा असे आव्हान पोलीस हेडकॉन्स्टेबल बजरंग हेब्बाळकर यांनी केले आहे.
ताराबाई पार्कात ६२ हजाराची चोरी
कोल्हापूर ः ताराबाई पार्क येथील सरलष्कर हॅरीटेज कॉम्प्लेक्स येथील गेस्ट हाऊसमध्ये २९ एप्रिलला चोरी झाली. यात ई-बाईक, गियरची सायकल, लॅपटॉप, हार्डडिस्क असा सुमारे ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. अनिरुद्ध उदय खाडे (वय ३८,आझाद गल्ली, गुजरी कॉर्नर) यांनी शाहुपूरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय विश्रामगृहाच्या समोर सरलष्कर हॅरीटेज कॉम्प्लेक्स आहे. यात एका खासगी कंपनीचे गेस्टहाऊन आहे. कंपनीचे कामगार २९ एप्रिलला घराला कुलुप लावून गेल्यावर येथे चोरी झाल्याचा अंदाज आहे. चोरट्याने समोरील दरवाजाचा कडी-कोईंडा तोडून आत प्रवेश केला होता. काही दिवसांनी हा प्रकार लक्षात आला. आज गुन्हा शाहुपूरी पोलिस ठाण्यात दाखल केला गेला.
मारहाणप्रकरणी पाचजणांवर गुन्हा
सरवडे: जमाव, मारहाण तसेच लज्जा उत्पन्न करणारे संभाषण केल्याप्रकरणी उमेश प्रकाश शिंदे यांच्यावर विनयभंगाचा तर अन्य पाचजणांवर राधानगरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. माहिती अशी, फिर्यादी एका गावातील आहेत. आरोपी शिंदे, दीपक शिंदे, सारा शिंदे, शोभा शिंदे ,अक्काताई शिंदे हे राधानगरी येथील आहेत. तर फिर्यादी व आरोपी पै- पाहुणे आहेत. दरम्यान फिर्यादी यांच्या घरी जाऊन त्यांच्या सासूबाई यांना शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादीस हाताला धरून घराबाहेर खेचत नेले व उमेश शिंदे यांनी फिर्यादीस अश्लील शब्द वापरून लज्जा उत्पन्न केली असल्याबाबत आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एच.पी.बुरटे करत आहेत.
वाहून गेलेल्या तरुणाचा वारणात मृतदेह
तुरुकवाडी : कोकरुड-मलकापूर दरम्यानच्या पुलानजिक वारणा नदीत वाहून गेलेल्या लांजा येथील तरुणाचा आज तिस-या दिवशी मृतदेह आढळून आला.
शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याचे सुमारास पेंढारवाडी (ता. लांजा, जि. रत्नागिरी ) येथील तरुण प्रशांत पांडूरंग पेंढारे (वय ३३) हा पुणेकडे निघाला होता. तुरुकवाडी हद्दीत वारणानदीत तो आंघोळीसाठी उतरला असता पाय घसरुन तो नदीत वाहून गेला होता. तीन दिवस नातेवाईक व शाहूवाडी पोलिस नदीत त्याचा शोध घेत होते. आज दुपारी त्याचा मृतदेह कोकरुड हद्दीत आढळून आला.
इचलकरंजीत व्यावसायिकाची आत्महत्या
इचलकरंजी : इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात राहणार्या एका व्यावसायिकाने गळफास घेवून आत्महत्या केली.शिवानंद चंद्रकांत स्वामी (वय ४८) यांनी असे त्याचे नाव आहे. रविवारी (ता.८) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. राहत्या घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये अँगलला नायलॉनच्या दोरीने त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबतची वर्दी सुहास स्वामी यांनी दिली आहे.
जयसिंगपुरात डंपर चोरीला
जयसिंगपूर : शहरातील नांदणी नाक्यावरून अंकुश काशीनाथ पवार (रा.संभाजीनगर जयसिंगपूर) यांचा डंपर चोरीला गेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या डंपरची किंमत अंदाजे एक लाख रूपये आहे. याबाबतची फिर्यात अंकुश पवार यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02202 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..