
सरवडे
किसनराव मोरे चॅरिटेबल ट्रस्टचे
विविध क्षेत्रांतील पुरस्कार जाहीर
सरवडे ः कै. आ. किसनराव मोरे यांच्या ४८ व्या पुण्यतिथीनिमित्त सरवडे (ता. राधानगरी) येथील किसनराव मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे विविध क्षेत्रांतील पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण १४ मे रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती पंचायत समिती माजी सदस्य आर. के. मोरे यांनी दिली. आदर्श शेतकरी म्हणून कुलदीप प्रकाश खोत (चांदेकरवाडी), आदर्श सामाजिक कार्यकर्ता विनोद मुसळे, (कपिलेश्वर), आदर्श शिक्षक माध्यमिक प्रा. चंद्रशेखर कांबळे (राधानगरी), आदर्श प्राथमिक शिक्षक प्रमोद भांदिगरे (कसबा वाळवे), विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार शाहू चौगुले (तारळे खुर्द), तसेच उत्कृष्ट बचत गट पुरस्कार आदर्श महिला बचत गट राशिवडे बुद्रुक यांना जाहीर झाला आहे. त्यांना पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02208 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..