
टडे ४ स पटा
33955
‘अवनि’संस्थेच्या मुलांनी
तयार केली विविध रोपे
कोल्हापूर ः अवनि संस्था संचालित अभ्यासिकेतील मुलांनी आज वाशी (ता. करवीर) येथील ‘अवनि’च्या कस्तुरबा गांधी रोपवाटिकेत श्रमदान केले. मुलांनी तयार केलेली रोपे रोपवाटिकेस प्रदान केली. या मुलांना संस्थेतर्फे गौरविण्यात आले. विचारेमाळ, शिरोली, राजेंद्रनगर, साळोखे पार्क, रेंदाळ, मुडशिंगी येथील अभ्यासिका व बाल अधिकार मंचच्या मुलांनी दोन महिन्यांपासून करंजी, गुलमोहर, चेरी, बदाम, कडीपत्ता, उंबर, पपई, जांभूळ, चिंच, पेरू, कोरफड, गवती चहा, तुळस अशा ५०० रोपांची निर्मिती केली. तसेच औषधी वनस्पती घराशेजारी लावण्याचा उपक्रम घेतला. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू व सिडबँक मुलांनी तयार केली. अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले व उपाध्यक्ष संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बाल अधिकार मंच केडर जोया तुर्की, सुमित सोनवणे, यश मिसाळ, अनुष्का मागाडे, प्रिन्स चव्हाण, शिक्षिका लता धुमाळ, अलनिसा गणीभाई, सारिका मागाडे, सुरेखा धनवजीर, रेश्मा चव्हाण, वनिता कांबळे, अन्नपूर्णा कोगले, प्रकल्प समन्वयक अविनाश शिंदे उपस्थित होते.
34173
‘रवळनाथ’तर्फे प्रा. डॉ. जाधव यांचा सत्कार
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी प्रा. डॉ. अजितसिंह जाधव यांची निवड झाल्याबद्दल येथील श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे त्यांचा सत्कार झाला. संस्थेचे संस्थापक एम. एल. चौगुले यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दत्ता पाटील, ‘रवळनाथ’चे संचालक महेश मजती, कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष विजय हरगुडे, शाखा सल्लागार भास्कर सांगावकर आदी उपस्थित होते.
चौगुले महाविद्यालयात व्याख्यान
पुनाळ : पोलिस अधीक्षक, कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून ‘श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात माळवाडी-कोतोली येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षामार्फत ‘सांस्कृतिक समिती व अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षम शाळा, सुदृढ शाळा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अजय चौगुले होते. ए. आर. महाजन यांनी स्वागत केले. पन्हाळ्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे म्हणाले, ‘कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वाचन कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हायचे असेल तर निवडलेल्या क्षेत्राची आवड जोपासा.’ संस्था सचिव शिवाजी पाटील, प्र. प्राचार्या डॉ. व्ही. पी. पाटील, डॉ. बी. एन. रावण, डॉ. उषा पवार आदी उपस्थित होते. एम. एस. सावंत यांनी आभार मानले.
01570
हळदी ः निवृत्तीनिमित्त धनाजी कलिकते यांचा सत्कार करताना शंकरराव जाधव आदी मान्यवर.
निवृत्तीनिमित्त धनाजी कलिकते यांचा सत्कार
हळदी ः जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष व हळदी मंडलचे मंडलाधिकारी धनाजी गणपतराव कलिकते यांच्या निवृत्तीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्या हस्ते सत्कार झाला. श्री. कलिकते यांनी जिल्हा तलाठी संघटनेत सहचिटणीस, चिटणीस पदावर काम केल्यानंतर मागील पाच वर्षे ते जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. याकाळात जिल्ह्यातील तलाठ्यांच्या अनेक प्रश्नांना जिल्हा तसेच राज्य पातळीवर सोडवण्यात त्यांनी योगदान दिले. हळदी मंडल अधिकारी म्हणून काम करत असताना २०१९ व २०२१ या काळात पूरग्रस्तांना निधी मिळवून देण्यात त्यांनी भूमिका पार पाडली. यावेळी उपअधीक्षक रवींद्र साळुंखे, महाराष्ट्र तलाठी संघटनेचे शिवकुमार पाटील, उदय लांबोरे, अनिल काटकर, भाऊसाहेब खोत आदी उपस्थित होते.
02848
02847
केरबा खाडे, कांचन जाधव
अध्यक्षपदी केरबा खाडे
सरवडे : कासारपुतळे, (ता. राधानगरी) येथील अनंत खाडे विकास सेवा संस्थेची निवडणूक संस्थापक सीताराम खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदी केरबा खाडे, तर उपाध्यक्षपदी कांचन जाधव यांची निवड झाली. यावेळी संचालक साताप्पा वरुटे, मारुती वारके, आनंदा तावडे, विष्णू खाडे, शिवाजी बामुगडे, प्रवीण खाडे, रघुनाथ चौगले, शिवाजी गाडीवड्ड, मारुती कांबळे, हिराबाई खाडे, सचिव सागर पाटील, कर्मचारी प्रकाश खाडे उपस्थित होते.
वृद्धाश्रमाला गाद्या भेट
कागल : मतिवडे (ता. निपाणी) येथील भारतीय समाज सेवा संस्था निराधार-बेवारस वृद्धाश्रमात इचलकरंजी येथील कांचन जयंतीलाल सालेछा यांनी १२ गाद्या भेट दिल्या. मैत्री फाउंडेशन (इचलकरंजी) व चंद्रप्रकाश छाजेड यांनी या निराधार लोकांसाठी नेहमीच सहकार्याची भावना ठेवली आहे. आश्रमास लोकांना राहण्यासाठी हॉलही बांधून दिला आहे, अशी माहिती निराधार अनाथ आश्रमचे संस्थापक अमर पोवार व शुभांगी पोवार यांनी केले.
02854
कोल्हापूर : कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांना शुभेच्छा देताना अध्यक्ष प्रकाश पोवार आदी.
कामगार कल्याण मंडळाचा वर्धापन दिन
सरवडे ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६९ वा वर्धापन सोहळ्यानिमित्त मंडळाचे प्रमुख व कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांचा शिवनेरी बांधकाम कामगार संघटनेतर्फे अध्यक्ष प्रकाश पोवार यांच्या हस्ते सत्कार झाला. वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पोवार यांनी कामगार कल्याण मंडळामुळे अनेक सेवा सुविधा उपलब्ध झाल्या असून, कष्टकरी कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण झाल्याचे सांगितले. याप्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी तालुका प्रतिनिधी विजय सुतार, अशोक पाटील, शाखा पदाधिकारी पांडुरंग कुसाळे, समीर पाटील आदी उपस्थित होते.
00575
प्रयाग चिखली ः येथील रघुनाथ पाटील युवक मंचतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाच्या प्रसंगी मान्यवर.
प्रयाग चिखलीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रयाग चिखली ः येथील रघुनाथ पाटील युवा मंचतर्फे दहावी, बारावी परीक्षेतील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र शिल्ड व बक्षीस देऊन सत्कार केला. पार्श्वनाथ बँकेचे संचालक केवलसिंग रजपूत. आम्ही चिखलीकर ट्रस्टचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, आरटीओ गणेश वरुटे, बी. आर. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. काजल पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन मंचचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामचंद्र गुरव, रघुनाथ पाटील, संभाजीराव पाटील, रघुनाथ पाटील, सेवा संस्था अध्यक्ष बटूसिंग रजपूत, उपाध्यक्ष सर्जेराव शिपेकर, धनाजी चौगले, निशिकांत पाटील, रामचंद्र जाधव, बाळासाहेब वरुटे, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02263 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..