सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

03046
सरवडे : वन्यजीव सप्ताहानिमित्त कार्यक्रमात बोलताना डॉ. संदीप पाटील, व्यासपीठावर इतर.
------------

मोरे हायस्कूलमध्ये वन्यजीव सप्ताह
सरवडे : येथील किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये वन विभाग कोल्हापूर, वनपरिक्षेत्र राधानगरी व परिमंडळ सरवडे यांच्या वतीने वन्यजीव सप्ताह झाला. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक डी. एम. टिपुगडे होते. व्याख्याते डॉ. संदीप पाटील यांनी नैसर्गिक साधनसंपत्ती व वन्यपशू यांचे महत्त्व सांगून वन्यजीवांच्या संरक्षणाची माहिती दिली. सर्पमित्र ऋषिकेश सुतार यांनी सापाबद्दलच्या अंधश्रद्धा कशा दूर कराव्यात याची माहिती दिली. वनपाल सर्जेराव पाटील, वनरक्षक महादेव आंगज यांची मनोगते झाली. कार्यक्रमास वनरक्षक राधेशाम भुसिंगे, सरिता पाटील, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. एस. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. बी. पाटील यांनी आभार मानले.