सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

साठे दूध संस्थेतर्फे उत्पादकांचा सत्कार
सरवडे : कासारवाडा पाटणकर (ता. राधानगरी) येथील सीताराम साठे महिला दूध संस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा रूपाली खाडे होत्या. खाडे यांनी संस्थेस २ लाख १० हजार नफा झाल्याचे सांगितले. यावेळी म्हैस दूधात सर्वाधिक पुरवठा करणारे सभासद अनुक्रमे सीमा वारके, शालाबाई बसरवाडकर, विमल फराकटे, गाय दुधात सर्वाधिक पुरवठा करणारे सभासद नंदा तावडे, सुशीला हिरुगडे, सुनीता मोरे यांचा बक्षीस देऊन सत्कार झाला. सभेतील चर्चेत कल्पना पाटील, मंगल चव्हाण, वर्षा पाटील, गीता पाटील आदी सभासदांनी भाग घेतला. सभेस उपाध्यक्षा कल्पना पाटील, संचालिका, सभासद उपस्थित होते. सचिव कृष्णा आकनूरकर यांनी आभार मानले.