सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

03078
सरवडे : दूध उत्पादकांना दिवाळी भेटवस्तू वाटप करताना संचालक मंडळ.


सरवडेत ‘नकाते दूध’तर्फे भेटवस्तू
सरवडे : येथील शंकरराव नकाते सहकारी दूध संस्थेच्या वतीने सभासदांना दिवाळी भेटवस्तू वाटप झाले. अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीकांत नकाते होते. सचिव शहाजी व्हरकट यांनी स्वागत केले. यावेळी दूध उत्पादकांना दिवाळीसाठी तेल वाटप झाले. संस्थेने म्हैस दुधाला १३ व गाय दुधाला ११ टक्के प्रमाणे रिबेट वाटप केला असून दिवाळी सणासाठी तेलाचे वाटप केल्याचे अध्यक्ष नकाते यांनी सांगितले. सभेस उपाध्यक्ष तुकाराम पाटील, हिंदुराव मोरे, मारुती पाटील, बाबूराव मोरे, अशोक मोरे, विक्रमसिंह व्हरकट, रजनी मोरे, सविता मोरे, कृष्णात लोहारसह सभासद उपस्थित होते. संचालक रामचंद्र कुरळे यांनी आभार मानले.