सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

०३०९३
आकनूर ः येथे विकासकामांचे उद्घघाटन करताना विजयसिंह मोरे.
----------------

आकनूरला विकासकामांचे उद्घाटन
सरवडे : राधानगरी तालुक्याच्या विकासासाठी खासदार संजय मंडलिक यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींमार्फत निधी मिळवू, असे गोकुळ संचालक विजयसिंह मोरे यांनी सांगितले. आकनूर (ता. राधानगरी) येथे खासदार मंडलिक यांच्या फंडातून व विजयसिंह मोरे यांच्या प्रयत्नातून गटारी, विकासकामांच्या उद्घघाटनावेळी ते बोलत होते. मोरे म्हणाले, ‘राधानगरी तालुका दऱ्याखोऱ्यांत, डोंगरात वसलेला असून लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त निधी या तालुक्यात खर्च करणे अपेक्षित आहे. तालुक्याच्या विकासासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित यावे.’ एस. के. पाटील यांनी स्वागत केले. युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. सरपंच यू. डी. पाटील, संचालक एकनाथ पाटील, आबाजी पाटील, उपसरपंच गणेश कांबळे, ए. एल. पाटील, राजेंद्र चव्हाण, यशवंत रानमाळे, बी. जी. पाटील, मंगेश पाटील, धोंडीराम पाटील, संतराम पाटील, सदाशिव पाटील, रंगराव पाटील, टी. एस. पाटील, संभाजी पाटील, आनंदा पाटील, बी. एस. पाटील, बळवंत पाटील, डी. एम. जरग, रंगराव चौगले उपस्थित होते. राजू कांबळे यांनी सूत्रसंचालन, राजू चव्हाण यांनी आभार मानले.