सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

ं03098
मांगोली : विठ्ठलराव खोराटेंचा सत्कार करताना ॲड. पाटील व इतर.

मांगोली : विठ्ठलराव खोराटेंचा सत्कार
सरवडे : बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व जनता दलाचे जेष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे यांना आंतरराज्य सहकाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मांगोलीत विविध संस्थांतर्फे त्यांचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी ॲड. आर. डी. पाटील होते. खोराटे म्हणाले,‘ सहकार, जनहिताचे काम केल्यामुळे आंतरराज्य पुरस्काराचा सन्मान मिळाला.’ अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘सहकारात पारदर्शक कारभार करून खोराटेंनी संस्था आदर्शवत बनविल्याने सहकाररत्न पुरस्काराने सन्मानित केले.’ याप्रसंगी राधानगरी अर्बन बँकेच्या संचालकपदी निवडीबद्दल दतात्रय धनगर यांचा सत्कार झाला.’ एस. डी. पाटील यांनी स्वागत केले. बिद्रीचे माजी संचालक नेताजी पाटील,ॲड. शिवराज खोराटे, प्रा. राजाराम एकशिंगे, युवराज पाटील, अशोक पाटील, जयवंत पाटील, बाळकृष्ण पाटील, एम. डी. जाधव उपस्थित होते. राजरत्न पाटील यांनी आभार मानले.