सोळांकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोळांकूर
सोळांकूर

सोळांकूर

sakal_logo
By

04342
श्रीमंत संयोगिताराजे घाटगे यांचे निधन
कागल, ता. ११ : येथील ज्युनिअर कागलकर राजघराण्यातील श्रीमंत संयोगिताराजे अजितसिंहराजे घाटगे (वय ९३) यांचे निधन झाले. येथील श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळ, कागलचे अध्यक्ष श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे घाटगे यांच्या त्या आई, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक व अखिलेशराजे घाटगे यांच्या त्या आजी होत. त्यांचे पार्थिव ऐतिहासिक काकासाहेब वाड्यात दर्शनासाठी ठेवले होते.
यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, स्वरूप महाडिक तसेच सावंतवाडीकर सरकार, नेर्लीकर सरकार, खानविलकर सरकार, दत्तवाडकर सरकार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोगिताराजे कोल्हापुरातील विविध क्लबच्या मेंबर होत्या. श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका होत. खासबाग परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) सकाळी येथील खासबागमध्ये आहे.

................
61788
उषा शिंदे
कोल्हापूर : मोरेवाडी, केदारनगरातील उषा प्रकाश शिंदे (वय 56) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. 13) आहे.

61789
नीलिमा गुडाळे
कोल्हापूर : प्रतिभानगरातील सौ. नीलिमा उज्वल गुडाळे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, नातू, मुलगी, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

61792
पांडुरंग ताटे
कोल्हापूर : इस्पुर्ली (ता. करवीर) येथील पांडुरंग आबाजी ताटे (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

61794
बाळासाहेब पाटील
कोल्हापूर : उत्तरेश्‍वर पेठ येथील बाळासाहेब दिनकर पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

०३११५
बंडोपंत पाटील
सोळांकूर : पंडेवाडी (ता. राधानगरी) येथील बंडोपंत महिपती पाटील (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गटसचिव संघटनेचे नेते प्रकाश पाटील यांचे ते वडील होत.

३३६३
बयाबाई कांबळे
पुनाळ : येथील श्रीमती बयाबाई श्रीपती कांबळे (वय ८५) यांचे निधन झाले. वायरमन कृष्णात कांबळे यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

७५९९
शांताबाई सपकाळ
घुणकी : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील शांताबाई लक्ष्मण सपकाळ (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.
---------
२५२२
राजेंद्र जोशी
गारगोटी : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील राजेंद्र बळवंत जोशी (वय ५५) यांचे निधन झाले. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोनाळी शाखेचे शाखाधिकारी होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

१३८४
महादेव चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे ः येथील वारकरी संप्रदायातील महादेव धोंडी चौगुले (वय ८९) यांचे निधन झाले. श्री मसाईदेवी विकास संस्थेचे चेअरमन अर्जुन चौगुले यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

gad११७.jpg :
61823
दत्तात्रय रोटे
गडहिंग्लज : येथील हाळलक्ष्मीनगरमधील दत्तात्रय मारुती रोटे (वय ८३) यांचे निधन झाले. ते राज्य राखीव दलातून (एसआरपीएफ) निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी (ता. १३) रक्षाविसर्जन आहे.

४३४४
शांताबाई गवंडी
कागल : येथील शांताबाई भगवान गवंडी (वय ७८) यांचे निधन झाले. मंडल अधिकारी कुलदीपक गवंडी यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे. त्यांच्या मागे मुलगा, सून, नात व चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.

००८३३
हिराबाई काटे
सातवे : येथील हिराबाई नामदेव काटे (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १२) आहे.

०२७९४
रत्नाबाई सूर्यवंशी
कळे : येथील श्रीमती रत्नाबाई दिनकर सूर्यवंशी-बुरुड (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

61838
अरुणाबेन शहा
गडहिंग्लज : येथील पाटणे गल्लीतील श्रीमती अरुणाबेन वस्तुपाल शहा (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. गडहिंग्लज फार्मा एलएलपीचे संचालक सुनील शहा यांच्या त्या आई होत.