सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

०३१२०
सरवडे : महालक्ष्मी आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यांनतर जल्लोष करताना शिक्षक नेते व कार्यकर्ते.
---------------------

सत्तारुढ महालक्ष्मी आघाडीचेच वर्चस्व
प्राचार्य देसाई शिक्षक पतसंस्था निवडणूक; विरोधी शाहू आघाडीला तीन जागा


सरवडे, ता. १२ : राधानगरी तालुका कार्यक्षेत्र असलेल्या येथील प्राचार्य एम. आर. देसाई शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दुरंगी लढतीत सत्ताधारी महालक्ष्मी शिक्षक आघाडीचे तेरा उमेदवार विजयी झाले. विरोधी राजर्षी शाहू आघाडीला तीन जागा मिळाल्या. रामचंद्र पाटील व भीमराव रेपे यांना २८२ समान मते पडल्याने फेरमतमोजणी घेतली. शुभांगी डवरी यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या शिक्षक नेते व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. व्ही. शिंदे यांनी काम पाहिले.

संस्थेचे प्राथमिक शाळांसह १० माध्यमिक शाळांचे ५३८ शिक्षक सभासद असून ५२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तीन तास मतमोजणी चालली. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी १३ जागा जिंकल्या. विजयी उमेदवार व मते ः शामराव चव्हाण (३४२), वसंत कदम (३०२), श्रीधर खोराटे (३०४ ), रामदास नकाते (२८३), राजाराम नारींगकर (३६१), धनाजी पाटील (३२०), पांडुरंग पाटील (३२०), पांडुरंग पाटील (३३३), संजय पाटील (३२३), रवींद्र वागरे (३०५), आनंदराव वागवेकर (३६१), भीमराव रेपे (२८५), इतर मागासवर्गीय -महादेव कुंभार (३०३), महिला राखीव -शुभांगी पाटील (३७४ ), मीनाक्षी जाधव (३१०). अनुसूचित जाती-जमाती - नानासो माने (२७०). निवडणूक यशस्वीतेसाठी मॅनेजर एकनाथ पाटील, केंद्राध्यक्ष सागर रानमाळे, सुनील बरगे, विजय पालकर, राजेंद्र देवर्डेकर, मधुकर गोते, लक्ष्मण पाटील, सुरेश पाटील, राजेंद्र फासके, शिवाजी पाटील यांनी काम पाहिले.
सत्ताधारी गटाचे नेतृत्व प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष नामदेव रेपे, माजी संचालक बी. एस. पाटील, कोजिमाशि संचालक राजेंद्र रानमाळे, सुभाष खामकर, डी. पी. पाटील आदींनी केले, तर विरोधी राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीचे नेतृत्व संभाजी पाटील यांनी केले.