मांजरखिंड-काळम्मावाडी मार्गावर विविध संघटनांकडून स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांजरखिंड-काळम्मावाडी मार्गावर
विविध संघटनांकडून स्वच्छता
मांजरखिंड-काळम्मावाडी मार्गावर विविध संघटनांकडून स्वच्छता

मांजरखिंड-काळम्मावाडी मार्गावर विविध संघटनांकडून स्वच्छता

sakal_logo
By

03148
काळम्मावाडी : स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले विविध संघटनांचे सदस्य.


मांजरखिंड-काळम्मावाडी रस्त्याचे
‘बायोडायव्हर्सिटी पाथ’ असे नामकरण
सरवडे : जैवविविधतेने नटलेल्या राधानगरी तालुक्यातील जंगलाचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेला आहे. याची जाणीव ठेवून मांजरखिंड ते काळम्मावाडी रस्त्याचे ‘बायोडायव्हर्सिटी पाथ’ असे नामकरण करण्यात आले. या रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे रोपणही करण्यात आले. ही झाडे जगवणे तसेच या उपक्रमाचे सातत्य राखण्यासाठी दर पंधरा दिवसांतून अशा प्रकारची स्वच्छता मोहीम राबवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. राधानगरी महाविद्यालयाचा ऑर्किड नेचर क्लब, के. के. इको वॉरियर्स ग्रुपचे सदस्य, सामाजिक वनीकरण व प्रादेशिक वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. या वेळी मांजरखिंड ते काळम्मावाडी धरणापर्यंतच्या रस्त्यावरील सर्व प्लास्टिक व काचेचा कचरा संकलित करून स्वच्छचा करण्यात आली.