सृजन मंचचे पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सृजन मंचचे पुरस्कार जाहीर
सृजन मंचचे पुरस्कार जाहीर

सृजन मंचचे पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

सृजन मंचचे पुरस्कार जाहीर
सरवडे : सृजन वाचन व समाज प्रबोधन साहित्य सांस्कृतिक मंचतर्फे देण्यात येणारे या वर्षीचे राज्यस्तरीय सृजन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये वरिष्ठ अधिकारी व ज्येष्ठ साहित्यिक राम मेस्त्री (मुंबई) यांना सृजन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गेली १८ वर्षे या संस्थेतर्फे पुरस्कारांचे वितरण होते. या वर्षीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत डॉ. फारुक देसाई - सृजनशील आरोग्य अधिकारी पुरस्कार, प्रकाश केसरकर - सृजनशील प्रकाशक पुरस्कार, अरविंद मानकर - सृजन साहित्य गौरव, सुदर्शन वडार -सृजन क्रीडा रत्न पुरस्कार, तेजस्विनी पवार- सृजन वनश्री पुरस्कार, राजू तौंदकर-उपक्रमशील शिक्षक असे पुरस्कार घोषित करण्यात आले. पुरस्कारसाठी विविध विभागांतून २७ प्रस्ताव आल्याचे सृजन मंच अध्यक्ष किरण पाटील यांनी सांगितले. या वेळी उपाध्यक्ष संपत चव्हाण, अमरनाथ शेंडगे, रमेश वारके, प्रा. अनंत चौगुले, शकुंतला राजहंस, जीवन भांदिगरे, रोहन कदम आदी उपस्थित होते. या वर्षी संस्थेतर्फे जिल्हास्तरीय ऑनलाइन शिक्षकांच्या कराओके स्पर्धा व विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित केल्याचे उपाध्यक्ष संपत चव्हाण यांनी दिली.