Wed, Feb 8, 2023

सरवडे
सरवडे
Published on : 9 December 2022, 1:22 am
03153
प्रा. शिवाजी परीट यांना पीएच.डी.
सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथील शिवाजी आनंदा परीट यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. बिद्री, (ता. कागल) येथील दूधसाखर महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘कोल्हापूरचा औद्योगिक विकास (इ. स.१९७५ ते २०००)’ विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना प्रा. डॉ. विलास मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष के. पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, सचिव सर्जेराव किल्लेदार यांचे प्रोत्साहन व डॉ. अवनिश पाटील, प्रा. डॉ. संजय पाटील, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, प्राचार्य डॉ. संजय पाटील यांचे सहकार्य लाभले.