सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

03166
सरवडे : मानसिंग पाटील यांचा सत्कार करताना उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, संजय पाटील व इतर.

पंतप्रधान मोदींनी भारताचे स्थान उंचावले
मंत्री पाटील; सरवडेत भाजप प्रवेश कार्यक्रम
सरवडे, ता. २२ : भाजप पक्ष उभारणीसाठी मातब्बर नेत्यांनी कष्ट घेतले. पक्षाच्या माध्यमातून विकासकामांचा डोंगर उभा करीत कळस चढविण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. जागतिक पातळीवर भारताचे स्थान मोदींनी उंचावले, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मानसिंग पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्रीचे माजी उपाध्यक्ष शंकरराव पाटील होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकजण भाजपमध्ये येत आहेत. मानसिंग पाटील यांनी भाजपमध्ये वेळीच प्रवेश केला आहे. त्यांचा भाजपमध्ये योग्य सन्मान होईल.’ यावेळी मानसिंग पाटील म्हणाले, ‘देशात व राज्यात विकासाचे व्हीजन घेवून भाजप कार्यरत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, संजय पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाठबळ दिल्याने चांगले काम करण्याची संधी मिळेल.’
तालुकाध्यक्ष संभाजी आरडे यांनी स्वागत, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राहुल देसाई, लहू जरग, रामचंद्र पाटील, धीरज करलकर, स्वप्नील पातले, विलास रणदिवे, सनील इंगवले, कृष्णात व्हरकट, शिवाजी पाटील, आनंदा पाटीलसह कार्यकर्ते उपस्थित होते.