
सरवडे
शेळेवाडीत विशेष श्रमसंस्कार शिबिर
सरवडे, ता. २३ : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर श्रम आणि स्वच्छतेचे महत्व कळावे म्हणून विशेष श्रमसंस्कार शिबिरांचे आयोजन केले जाते; असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. डी. पाटील यांनी केले. शेळेवाडी (ता. राधानगरी) येथे दूधसाखर महाविद्यालय बिद्रीमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटमार्फत निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. रिना प्रवीण पाटील होत्या.
यावेळी ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळावे आणि गावकऱ्यांच्या बरोबर सुसंवाद साधता यावा यातूनच व्यक्तिमत्व विकसित व्हावे यासाठी या संस्कार गरज ओळखून त्याचे आयोजन केले जाते. त्याचा फायदा गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी करून घ्यावा.’
कार्यक्रमाचे डॉ. एस एन कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. लक्ष्मण करपे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस एच पाटील यांनी आभार मानले.
दत्तात्रय निकम,शशिकांत पाटील, नाना पाटील, सदाशिव पाटील, मदनराव पाटील,बाळासो पाटील, साताप्पा निकम,अनिल पाटील, पांडुरंग पाटील, प्रभाकर कांबळे,आनंदा पाटील,सदाशिव पाटील, शंकर पाटील, सर्जेराव पाटील,पांडुरंग पाटील, प्रवीण पाटील, एकनाथ कांबळे उपस्थित होते.