सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

03333
ग्रामसेवकाच्या बदलीसाठी निवेदन
सरवडे : सावर्डे पाटणकर (ता. राधानगरी) येथील ग्रामसेवक दीपक शंकर भोई वारंवार गैरहजर राहतात. विकासकामे राबवताना टाळाटाळ करतात. करवसुली २० टक्केच झाली. अशा अकार्यक्षम ग्रामसेवकाची बदली करून नवीन ग्रामसेवक द्यावा अन्यथा गाव बंद करून ग्रामपंचायतीस टाळे ठोकू, असा इशारा गटविकास अधिकाऱ्यांना सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी निवेदनाद्वारे दिला. निवेदनाचा आशय, ग्रामसेवक श्री. भोई विकासकामे राबवताना टाळाटाळ करतात. १४ वा वित्त आयोग खर्च झालेला नाही. १५ वित्त आयोग कामाच्या निविदा प्रसिद्ध झालेल्या नाहीत. नागरिकांना दाखल्यांसाठी १५ ते २० दिवस वाट पाहावी लागते. त्यामुळे ग्रामसेवक भोईंची बदली करून नवीन ग्रामसेवक न दिल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकू.’ निवेदनावर सरपंच सुमन मोरे, उपसरपंच सुरेश परिट व सदस्यांच्या सह्या आहेत. याबाबत ग्रामसेवक दीपक भोई म्हणाले, ‘सावर्डे पाटणकर व कपिलेश्वर या गावांची माझ्याकडे जबाबदारी आहे. दोन्ही गावे मोठी आहेत. सावर्डे पाटणकरमधील नवीन पदाधिकारी व सदस्यांना कायमस्वरूपी ग्रामसेवक हवा असल्याने त्यांनी निवेदन दिले.’