साकवप्रश्‍नी बदनामी राजकीय द्वेशातून : बबन पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साकवप्रश्‍नी बदनामी राजकीय
द्वेशातून : बबन पाटील
साकवप्रश्‍नी बदनामी राजकीय द्वेशातून : बबन पाटील

साकवप्रश्‍नी बदनामी राजकीय द्वेशातून : बबन पाटील

sakal_logo
By

साकवप्रश्‍नी बदनामी राजकीय
द्वेशातून : बबन पाटील
सरवडे, ता. १४ : भोपळवाडी (ता. राधानगरी) येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध उपयोजनेतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजांच्या शेताकडे जाण्यासाठी ५९ लाख ९६ हजार खर्चून बांधलेला साकव हा शासकीय नियमानुसार आहे. त्याचे बिल शासनाने अद्याप दिलेले नाही. मात्र राजकीय द्वेषातून बदनामी सुरू असल्याचा आरोप ठेकेदार, सरपंच बबन जाधव यांनी तळाशी (ता. राधानगरी) येथे पत्रकार परिषदेत केला. दोन दिवसांपूर्वी भोपळवाडी येथे ग्रामस्थांनी साकवाच्या कामाबाबत रास्ता रोको आंदोलन केले होते, या पार्श्‍वभूमीवर जाधव यांनी माहिती दिली.
जाधव म्हणाले, ‘‘मी तळाशी गावचा सरपंच आहे. काही मंडळी राजकीय आकसापोटी माझी बदनामी करत आहेत. साकवाबाबत चौकशीअंती समाज कल्याण विभागाचा स्वयंस्पष्ट तथ्‍यहीन अहवाल प्राप्त झाला आहे. या प्रकरणामागच्या बोलवित्या धन्याचा लवकरच पुराव्यानिशी भांडाफोड करू व आपली बदनामी करणाऱ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असाही इशारा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल जाधव यांनी दिला. सरपंचांची बदनामी टाळावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा तळाशी ग्रामस्थांनी दिला.’’ या वेळी उपसरपंच स्वाती पाडळकर, शंकर भांदिगरे, अशोक राऊत, तानाजी चव्हाण, सुलोचना पाटील, दादासो खाडे, दिलीप खाडे आदी उपस्थित होते.