आकनूर विठ्ठलाई देवी यात्रा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकनूर विठ्ठलाई देवी यात्रा उत्साहात
आकनूर विठ्ठलाई देवी यात्रा उत्साहात

आकनूर विठ्ठलाई देवी यात्रा उत्साहात

sakal_logo
By

आकनूर विठ्ठलाई देवीची यात्रा उत्साहात
सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथील श्री विठ्ठलाईची यात्रा जागर, मांड जागवणे व नवसाच्या गाराने अशा विविध कार्यक्रमाने उत्साहात झाली. होळीपासून चैत्रारंभापर्यंत स्थानिक आणि परंपरागत खेळी मंडळींनी पंधरा दिवस मांड जागवला होता. यावेळी यात्रेच्या प्रारंभी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे गुढी उभारणे, लिंब, गूळ खाणे, सकाळी गुढीपाडवा वाचन, दिवसभर खेळी मंडळींकडून घराघरांत सोंग दर्शन, सायंकाळी पारंपरिक वाद्य, करंडी वाद्य, लेझीम व ढोल, ताशांच्या गजरात, गुलाल व खोबऱ्याच्या उधळणीत यात्रा झाली. नवसाचे दंडवत, नवस भेट, नारळ तोरण अर्पण सोहळा व मानकरी आगमन, जागर मांड पूजन, देवीचा मांड जागवणे, सोंग, गण गवळण असे विविध कार्यक्रम झाले. दुसऱ्या दिवशी गोपाळ सोंगाने तमाशाची सांगता करण्यात आली. त्यानंतर दोन दिवस भाविकांनी यात्रेचा आनंद घेतला.