Sun, October 1, 2023

सोळांकूर
सोळांकूर
Published on : 13 May 2023, 5:56 am
03474
...
सावर्डे पाटणकर येथील युवकाचा
विजेच्या धक्क्याने पुण्यात मृत्यू
सोळांकूर,ता.१३: सावर्डे पाटणकर (ता.राधानगरी) येथील सुधीर तुकाराम पोवार (वय ४०) याचा चिंचवड, पुणे येथे विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सुधीर हा पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला होता. आपली ड्युटी संपवून घरी आल्यानंतर घराशेजारी असणाऱ्या गॅलरी शेजारुन गेलेल्या विद्युतवाहक तारेवर टॉवेल पडलेला होता. तो टॉवेल काढत असताना विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, वडील,पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.