सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

विनापरवाना लाकूड वाहतूकप्रकरणी तिघांवर गुन्हा

सरवडे: कासारवाडा पाटणकर (ता.राधानगरी) येथे ट्रॅक्टरमधून विनापरवाना खैर जातीचे जळावू लाकूड वाहतूक करताना तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर वनाधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वनविभागाला मिळालेल्या माहितीवरून गस्त वाढवली होती. गस्त घालीत असताना कासारवाडा पाटणकर येथे ट्रॅक्टर (एमएच -०९ एव्ही ६९२७) मधून खैर जातीचे लाकूड विनापरवाना वाहतूक होत असल्याचे आढळून आले. विनापरवाना वाहतूक करताना भास्कर तुकाराम पोवार (रा.कासारपुतळे), अशोक विष्णू बुकम (रा.मानबेट),नेताजी परशराम सावंत (रा. कासरपुतळे) यांना ताब्यात घेतले. भारतीय वन अधिनियमाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर मालासह जप्त करण्यात आला. ही कारवाई वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक, सरवडे वनपाल सर्जेराव पाटील, वनरक्षक महादेव आंगज, सरिता पाटील, संजय पवार, अशोक संकपाळ, बंडोपंत देवूलकर, संतोष करपे यांनी केली.