सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

मालवेजवळ पावणेचार किलो गांजा जप्त

नऊ जणांना अटक : अकरा मोबाईल, सात मोटारसायकल हस्तगत

सरवडे, ता. १६ : मालवे-बोरवडे रस्त्याजवळील पाटबंधारे विभागाच्या कॉलनीजवळ विक्रीसाठी आणलेला सुमारे पावणेचार किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. त्याचबरोबर विक्री करणारे व खरेदीसाठी आलेले अशा नऊ जणांना राधानगरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळील ७६,२८० रुपये किमतीच्या गांजासह मोटारसायकली, मोबाईल असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मालवे-बोरवडेकडे जाणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कॉलनीजवळ गांजा विक्री केली जात असल्याची माहीती राधानगरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार याठिकाणी छापा टाकला असता राहुल कृष्णात पाटील, अनिल बाबूराव तावडे (दोघेही रा. सरवडे) तर संतोष तानाजी कांबळे रा. तिटवे), अनिकेत सुभाष चौगले (रा. अर्जुनवाडा), दीपक आनंदा सूर्यवंशी (रा. कसबा तारळे), अभिमन्यू महादेव धावरे (रा. तुरंबे), उत्तम तानाजी रानमाळे (रा. सरवडे), अजित दतात्रय पाटील (रा. मालवे), संजय सदाशिव माळी (रा. बस्तवडे) यांना ७६ हजार २८० रुपये किमतीच्या ३ किलो ८१४ ग्रॅम वजनाच्या गांजासह ताब्यात घेण्यात आले. यामधील राहुल पाटील व अनिकेत तावडे हे दोघे गांजा विक्रीसाठी आले होते. त्यांनाही अटक करण्यात आले. त्यांच्याकडून गांजासह ४ लाख ४८ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये अकरा मोबाईल, सात मोटारसायकलींचा समावेश आहे. आज दुपारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात यादव, के. डी. लोकरे, अरविंद पाटील अधिक तपास करत आहेत.