Fri, Sept 22, 2023

सरवडे
सरवडे
Published on : 24 May 2023, 1:15 am
03525
...
मांगोलीच्या दत्त दूध संस्थेच्या अध्यक्षपदी रानमाळे
सरवडे : मांगोली (ता. राधानगरी) येथील दत्त सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या अध्यक्षपदी आनंदा महादेव रानमाळे यांची तर उपाध्यक्षपदी पांडुरंग ज्ञानू टिपुगडे यांची निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी आर. एम. माने होते. बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक नेताजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या या दूध संस्थेची सन २०२३ ते २८ अखेर पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. यामध्ये नूतन संचालक म्हणून संभाजी पाटील ,अशोक पाटील, जयवंत पाटील, आनंदा पाटील, सागर पाटील शांताबाई जाधव, सुनिता पाटील, संदीप कांबळे यांची निवड करण्यात आली.