टुडे ४ ॲंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ४ ॲंकर
टुडे ४ ॲंकर

टुडे ४ ॲंकर

sakal_logo
By

डिजिटल क्रांतीमुळे पाटीला सुटी
---
दरफलकांपुरतेच अस्तित्व; पाठीवरचे ओझे दिवसेंदिवस वाढतेच
डी. आर. पाटील : सकाळ वृत्तसेवा
सरूड, ता.२३ ः सध्या डिजिटल व अत्याधुनिक शिक्षणपद्धतीचा बोलबाला आहे. मात्र, पाटी हा शब्द उच्चारला तरी अनेक पिढ्यांच्या शाळेच्या आठवणी ताज्यातवान्या होतात. पूर्वी पाटी हा दप्तरातील अभ्यासाचा आणि एकूणच शिक्षणाचा अविभाज्य घटक होता. मात्र, काळाच्या ओघात पाटीला सुटी मिळून त्याची जागा डिजिटल माध्यमांनी घेतल्याचे दिसते.
कालौघात पाटीला सुटी मिळाली असली, तरी कधीकाळी पाटी हाच होमवर्कमधला महत्त्वाचा दुवा होता. त्याच्यात ही मातीची लाकडी फ्रेम लावलेली पाटी आणि दगडाची पाटी अशा दोन पाट्या होत्या. मात्र, काळ जसा पुढे सरकला तसा पाठीवरच्या दप्तरामधून पाटीनेही विश्रांती घेतली. शाळेत जाताना पहिल्याच दिवशी अक्षरे लिहिण्याचा श्रीगणेशा पाटीवर व्हायचा. इतकेच नव्हे, तर मुहूर्तावर पाटीपूजनाची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे. मात्र, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या जीवन व विद्यार्थी शैलीबरोबरच शिक्षणाची साधनेही बदलली आणि विद्यार्थ्यांच्या दप्तरातून पाटी गायब झाली. पाटी, पेन्सिलची जागा वही, पेन व अन्य आधुनिक साधनांनी घेतली. वहीत पेनाने लिहिलेले दीर्घकाल टिकून राहते किंबहुना तो एक विद्यार्थिदशेतला ठेवा म्हणून आपणाला जतन करता येतो. परंतु, पाटीवर पेन्सिलने लिहिलेले लगेच पुसले जाई. गुरुजींनी दिलेला होमवर्क पाटीवर लिहायचा अन तो पुसला जाऊ नये, यासाठी घेतली जाणारी काळजी काही औरच होती.
एवढेच नव्हे, तर सायंकाळी शाळा सुटल्यावर होणारा आनंद गगनात मावेनासा होई. या आनंदाप्रीत्यर्थ ‘शाळा सुटली आणि पाटी फुटली’ अशी गगनभेदी आरोळी देऊन मित्रांच्या घोळक्यात उधळण्याचा विद्यार्थिदशेतला आनंद जगावेगळाच होता. परंतु, पाटी गेली असली तरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे मात्र दिवसेंदिवस वाढल्याचे दिसून येत आहे.
कधी काळी शिक्षण व्यवस्थेतील पाटीचे महत्त्व अनन्यसाधारण होते. पाचवीलाच पाटी पुजली जायची. पण, जमाना बदलला. आता पाट्या फक्त धान्य, कपडे दुकानाबाहेर दरफलक दर्शविण्यासाठीच उरल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Srd22b00763 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top