सरूड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरूड
सरूड

सरूड

sakal_logo
By

स्वाभिमानीची आज
सरूडला जागर सभा
सागर संभूशेटे; ऊस परिषदेची जोरदार पूर्वतयारी
सरुड, ता. २३ : ‘स्वाभिमानी’च्या वतीने ‘जागर एफआरपीचा... संघर्ष ऊस दराचा’ यात्रेचा प्रारंभ येथून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या जाहीर सभेने उद्या (ता. २४) होत असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष सागर संभूशेटे यांनी दिली. दरम्यान, स्वाभिमानीची २१ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे १५ ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ‘जागर एफआरपीचा..संघर्ष ऊस दराचा’ यात्रेचे आयोजन केले आहे. याचा प्रारंभ येथून होत आहे.
संभूशेटे म्हणाले, ‘‘बाजारपेठेत साखरेला चांगला बाजारभाव आहे. साखर निर्यात तसेच इथेनॉल, को-जनरेशन आदी वाढीव उत्पन्नाच्या माध्यमातून कारखाने उसाला चांगला दर देऊ शकतात. हे पटवून देण्यासाठी संघटनेच्या वतीने शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २४ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत ‘जागर एफआरपीचा.. संघर्ष ऊस दराचा’ यात्रा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काढण्यात येणार आहे. सरूड (ता. शाहूवाडी) येथील ‘जागर सभे’ने ही यात्रा प्रारंभ होईल. यानंतर राधानगरी, गडहिंग्लज, हातकणंगले, कागल, चंदगड, कोडोली (पन्हाळा), करवीर, शिरोळ आदी ठिकाणीही सभांचे नियोजन केले आहे.’’

घर टू घर जागृती
संघटनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते घर ते घर फिरून शेतकऱ्यांना ऊस परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करणार आहेत. १५ ऑक्टोबरच्या ऊस परिषदेत ऊसदराच्या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार असल्याचेही युवा अध्यक्ष संभूशेटे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Srd22b00800 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..