सरुड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरुड
सरुड

सरुड

sakal_logo
By

01166
सरुड : येथील शिव शाहू महाविद्यालयात बोलताना प्रा. डॉ. मांतेश हिरेमठ.
............................

सरूडला नवीन शैक्षणिक धोरण,
तंत्रज्ञान व मराठी भाषेवर कार्यशाळा

सरुड, ता. २९ : नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्याधारित अभ्यासक्रमाला महत्त्व आहे. मराठी भाषेच्या अनुषंगाने विचार करता विविध भाषिक कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी करिअर घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मांतेश हिरेमठ यांनी केले. येथील श्री शिव शाहू महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत मराठी विभाग आयोजित ‘नवीन शैक्षणिक धोरण, तंत्रज्ञान आणि मराठी भाषा’ विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. प्रा. एल. के. बोराटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
ते म्हणाले, ‘निवेदन, पटकथा लेखन, संहिता लेखन, पत्रकारिता, अनुवाद आणि भाषांतर, संवादक व सर्जनशील लेखन अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्याची संधी आहे.’
यावेळी ‘तंत्रज्ञान व मराठी भाषा’ विषयावर बोलताना प्रा. डॉ. बाळासाहेब सुतार म्हणाले, ‘मराठी भाषेचा तंत्रज्ञानात वापर झाला तर भाषा अधिक समृद्ध होईल.’
प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरणातील बदल सर्वांनीच समजून घ्यावेत. भाषेसंदर्भात प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह सर्वांनीच जागरूक राहावे.’
कार्यक्रमास प्रा. डी. आर. नांगरे, डॉ. के. ए. पाटील, प्रा. आनंदा पाटील, प्रा. आर. के. गायकवाडसह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. प्रकाश नाईक यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. संगीता बोराटे यांनी आभार मानले.