भानुदास माने अध्यक्षपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भानुदास माने अध्यक्षपदी
भानुदास माने अध्यक्षपदी

भानुदास माने अध्यक्षपदी

sakal_logo
By

01179
भानुदास माने
01178
उमरफारूक आत्तार


भानुदास माने अध्यक्षपदी
सरूड ः येथील शिवाजी रोडे-पाटील गृहतारण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी भानुदास माने (कापशी) यांची, तर उपाध्यक्षपदी उमरफारूक आत्तार (सरूड) यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे संस्थापक हेमंत भालेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक शिक्षकांना आयकर सवलतीचा लाभ मिळवून दिला असून यातून सभासदांचे आर्थिक हित जोपासल्याचे सांगितले. दि. प्राथमिक शिक्षक बँकचे संचालक शिवाजी रोडे-पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. सर्जेराव काळे, आनंदराव हारुगडे, ए. डी. पाटील, संजय सुर्वे, प्रकाश पाटील, उत्तम खुटाळे, संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी संचालक, सभासद कर्मचारी उपस्थित होते. सदाशिव कांबळे यांनी आभार मानले.