सरुड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरुड
सरुड

सरुड

sakal_logo
By

B01186
सरुड ः येथे जाधव कुटुंबीयांना धनादेश प्रदान करताना बाळासाहेब खुटाळे, अल्लाबक्ष मुल्ला, जगदीश खुटाळे, सागर कांबळे आदी.

मृत सभासदाच्या वारसांना धनादेश
सरुड, ता. १६ ः बांबवडे नागरी पतसंस्थेने सभासदांच्या हिताचा विचार केला. म्हणूनच पतसंस्था सभासदावर आघात होतो तेव्हा प्राधान्याने त्याच्या पाठीशी राहते. यामुळेच संस्थेने सहकारात आदर्श निर्माण केला, असे प्रतिपादन संस्थापक उद्योगपती बाळासाहेब खुटाळे यांनी केले. येथे सभासद लक्ष्मण जाधव (चिंचोली) यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या वारसांना पाच लाखांच्या विमा सहाय्याचा धनादेश प्रदान करताना ते बोलत होते. शाखाधिकारी सागर कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
गारमेंट व्यवसायिक लक्ष्मण जाधव यांनी संस्थेतून कर्ज घेतले होते. या माध्यमातून त्यांचा विमा उतरविला होता. त्यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची रक्कम देण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अल्लाबक्ष मुल्ला, संचालक जगदीश खुटाळे, मधुकर बुवा, सदाशिव पाटील, दादासो पाटील, सागर पाटील, प्रकाश पाटील, विमा प्रतिनिधी मधुकर खडके हजर होते. रोखापाल माणिक किटे यांनी आभार मानले.