सरूड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरूड
सरूड

सरूड

sakal_logo
By

01198

लिपीकाचा मुलगा बनला अधिकारी

सरुडचा अजिंक्य मराठे करनिरीक्षक

सरुड, ता. २४ ः ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य करनिरीक्षक परीक्षेत येथील अजिंक्य अनंत मराठे याने यश मिळविले. अजिंक्यचे वडील सेवा संस्थेत लिपीक आहेत. अजिंक्यचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सरुड तर उच्च माध्यमिक शिक्षण सागाव (ता.शिराळा) येथे झाले. दहावीत ९५ टक्के तर बारावी विज्ञान शाखेत ८८ टक्के गुण मिळवून चुणूक दाखवली होती. वडिलार्जीत शेती तोकडी गुंठ्यातली. मात्र नाउमेद न होता त्याने यशाला गवसणी घातली.
दरम्यान अजिंक्यने काही वर्षांपूर्वी पुण्यात मोजके दिवस वर्ग लावले होते. मात्र, कोरोनानंतर घरीच बसून अभ्यास करत होता. मोठ्या व नामांकित क्लासला गेले तरच अधिकारी होता येते या समजाला त्याने यश खेचून तडा दिला. अजिंक्यने मेकॅनिकल इंजिनियरींगची पदवी प्राप्त केली आहे. २०१७ पासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीस सुरुवात केली. राज्यसेवा मुख्य परीक्षा तीनदा तर तोंडी परीक्षा एकदा दिली. त्याच्या यशानंतर मित्र परिवाराने जल्लोष केला.
यशाबाबत अजिंक्य म्हणाला, ‘मी घरी राहूनच माझ्या क्षमतेवर आणि परिवाराच्या पाठिंब्यावर अभ्यास केला. राज्यसेवेत यशाने तीनदा हुलकावणी दिली. मात्र जिद्द, चिकाटी आणि परस्थितीची जाणीव या जोरावर यश खेचू शकलो.