
सरुड
84479
सरूडला रक्तदान शिबिर
सरुड ः कोरोना काळानंतर रक्तदान करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. रक्तदानासारखे पवित्र कार्य युवकांनी हिरीरीने करावे, असे प्रतिपादन डॉ.विनायक पाटील यांनी केले. येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पाटील नर्सिंग होम आणि शिवप्रेमींच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १९) रक्तदान शिबिर झाले. ५८ युनिट रक्त संकलित झाले.‘रक्तदान.. जीवनदान’ टॅगलाईनखाली उपक्रम झाला. डॉ. विनायक पाटील यांनी रक्तदानाबाबत आवाहन केले. संजीवन ब्लड बँक (कोल्हापूर) युनिटप्रमुख अनिल सरनोबत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रक्तसंकलन केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्रासह भेटवस्तू देण्यात आली. उदय पाटील, डॉ. प्रवीण लाड, बळवंत सूर्यवंशी, गणपती पाटील, शिवाजी पाटील, योगेश भोसले, चंद्रकांत रेडकर, प्रवीण शिंदे, संतोष पाटील, श्रीकांत पाटील, राम लाड, ओमप्रकाश विंचू, प्रदीप यादव आदींनी संयोजन केले.